Harbhajan Singh react on dressing room conversation leak : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट वादाचे केंद्र बनले आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल समोर येत आहेत. कधी खेळाडूंवर कठोरता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत, तर कधी दौऱ्यात घडलेल्या काही घटनांबाबत धक्कादायक खुलासे केले जात आहेत. या संदर्भात, नुकताच एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की बीसीसीआयच्या आढावा बैठकीत कोच गौतम गंभीरने ड्रेसिंग रूमची चर्चा लीक केल्याप्रकरणी सरफराज खानचे नाव घेतले होते. यावर हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.

ड्रेसिंग रूममधून रोज नवीन गोष्टी बाहेर यायला नकोत –

हरभजन सिंग आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “गेल्या काही दिवसांत जे काही घडले आहे, मग ते ऑस्ट्रेलियात असो किंवा त्यापलीकडे असो. मैदानावर हार-जीत होतच असते. पण ड्रेसिंग रूममधून रोज नवीन गोष्टी बाहेर यायला नकोत. आज एक अहवाल आला आहे की कोच साहेब (गौतम गंभीर) म्हणाले की सरफराज खानने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी मीडियाला लीक केल्या आहेत. कोच साहेबांनी असे सांगितले असेल तर त्यांनी तसे करायला नको होते. जर सरफराज खानने ऑस्ट्रेलियात असे केले होते, तर तुम्ही कोच आहात त्याच्याशी बोलायला हवे होते. तो खेळाडू आहे, त्याला समजावून सांगा. तो एक युवा खेळाडू आहे, जो भविष्यात भारतासाठी खेळणार आहे.”

हिंदूंनी पारंपारिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये; मोहन भागवत असं का म्हणाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
मोहन भागवत म्हणतात, ‘हिंदूंनी पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये’
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…
Bollywood actor shah rukh khan fixes daughter suhana khan dress video viral
Video: पापाराझींसमोर लेकीचे कपडे नीट करताना दिसला शाहरुख खान, सुहानाबरोबरचा व्हिडीओ व्हायरल
Siddhivinayak Temple News
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, तोकडे कपडे घातल्यास प्रवेश बंदी; ‘अशी’ आहे नियमावली
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Dr Mohan Bhagwat statement on religion
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”

गौतम गंभीर वेळ द्यायला हवा –

हरभजन सिंग पुढे म्हणाला, “वरिष्ठ खेळाडू असल्यामुळे तरुणांना ज्ञान देणे हे आपले कर्तव्य आहे. जर सर्फराझने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्याचे कोच म्हटले असतील आणि प्रत्यक्षात सर्फराझने तसे केले असेल, तर ते चुकीचे आहे. ड्रेसिंग रूममधील चर्चा उघडपणे समोर यायला नकोत. गौतम गंभीर या कामात नवीन आहेत, त्यांना वेळ द्यायला हवा. नवीन प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी खेळाडूंनाही वेळ मिळायला हवा.” गौतम गंभीरच्या कार्यकाळात हे सर्व घडताना पाहून भज्जीला २००५-०६ च्या हंगामातील ग्रेग चॅपलच्या काळातील आठवण झाली.

हेही वाचा – BCCI 10 Rules : BCCI ने अखेर उचलले मोठे पाऊल! भारतीय खेळाडूंसाठी जारी केले १० कठोर नियम, पाहा यादी

एकत्र बसून प्रकरण मिटवायला हवे –

माजी फिरकीपटू पुढे म्हणाला, “तुम्ही एकत्र बसून हे प्रकरण मिटवायला हवे. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या ६-८ महिन्यांत खूप अफवा पसरल्या आहेत. खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रेग चॅपलच्या काळात २००५-०६ च्या मोसमातही असेच घडले होते. पण ड्रेसिंग रुममधील गोष्टी कोण लीक करत आहे आणि का करतंय?तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल उघडपणे वाईट बोलू नका, यामुळे तुमच्याच कुटुंबाची बदनामी होते.”

Story img Loader