ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाला ही मालिका म्हणजे खूप मोठी सरावाची संधी आहे. पण या मालिकेतून काही प्रमुख खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार या दोघांना विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयने २३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे. २८ सप्टेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका याच्यातल्या मालिकेतील पहिला टी२० सामन्यापासून सुरुवात होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिका रोहित ब्रिगेडने जिंकली असली तरी गोलंदाजांची कामगिरी सुमार झाली. अक्षर पटेल वगळल्यास अन्य गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. भुवनेश्वर कुमार हा महागडा गोलंदाज ठरला, तर पुनरागमन करणारा हर्षल पटेल व जसप्रीत बुमराह यांना फार काही छाप पाडता आली नाही. तिसऱ्या सामन्यात जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. विराट कोहली, रोहित, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांचा परतलेला फॉर्म ही संघासाठी जमेची बाजू आहे. हार्दिक पांड्या फलंदाजीत योगदान देतोय, परंतु रोहित त्याच्याकडून जपूनच गोलंदाजी करून घेताना दिसला. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे संघात आलेल्या अक्षरने त्याची जागा पक्की केलीय. ॠषभ पंतपेक्षा रोहित अनुभवी दिनेश कार्तिकवरच विश्वास दाखवताना दिसला.

तिरुअनंतपुरम येथून मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय संघ २८ तारखेला दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. अर्शदीप सिंग व दीपक चहर यांचे पुनरागमन होत आहे. मोहम्मद शमीला कोविड झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती आणि आफ्रिकेविरुद्ध तो तंदुरूस्त आहे की नाही, याची माहिती अजून आलेली नाही. दीपक हुड्डाचीही पाठदुखी बळावल्याचे वृत्त समोर येतेय, त्यामुळे तो या मालिकेला मुकू शकतो. भुवी व हार्दिकला या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. दीपक चहरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा   :  ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाजाला मागे टाकत विराट कोहली अव्वलस्थानी, टी२० मध्ये तो एकटाच 

भारतीय संघ

रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ॠषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका संघ

टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), बीजॉर्न फॉर्च्युन, रिझा हेंड्रिक्स, मार्को येनसेन, हेनरिच क्लासेन (यष्टीरक्षक), केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, रिली रोसोवू, तबरेझ शम्सी, त्रिस्तान स्टब्स.