scorecardresearch

Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था…”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ, पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना वापरले अपशब्द

भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना अपशब्द वापरत शिवी दिली.

Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था…”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ, पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना वापरले अपशब्द
सौजन्य- (ट्विटर)

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१२ जानेवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यातून संघात पुनरागमन करत असलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला २१५ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र याच सामन्यादरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना अपशब्द वापरात शिवी दिली.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीतून तो संघाचा समतोल राखतो, त्यामुळे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. यासोबतच त्याला खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटचा कर्णधारही बनवण्यात आले आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण कर्णधारपद मिळाल्यापासून तो त्याला खूप गर्व झाला आहे का अशी टीका चाहत्यांनी सोशल मीडियातून केलेली दिसतोय. याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या सामन्यात ज्यामध्ये हार्दिक पांड्या वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ करताना दिसत आहे.

हार्दिक पांड्याने वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ केली

वास्तविक, श्रीलंकेच्या डावात जेव्हा हार्दिक पांड्याने डावातील ११ षटके टाकली होती. षटक संपल्यानंतर, श्रीलंकेचे खेळाडू आपापसात बोलण्यासाठी खेळपट्टीच्या मध्यभागी आले आणि हार्दिकने अंपायरला चेंडू दिल्यानंतर पुढच्या गोलंदाजाची वाट पाहत होता. अशा परिस्थितीत स्टंप माईकवर हार्दिक डगआऊटमध्ये बसलेला तरुण वॉशिंग्टन थेट सामन्यातच वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ करताना दिसला. प्लेइंग ११ मध्ये सुंदरचा समावेश नव्हता आणि त्यामुळेच तो डग आऊटमध्ये बसला होता. अशा स्थितीत शेवटच्या षटकात पाणी न मिळाल्याने संतापलेल्या हार्दिकने स्टंप माइकमध्ये पाणी मागितले होते. हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे. तो म्हणाला की, “ मैने पानी मांगा था…तुने तो… दी” असे म्हणत त्याला अपमानित केले.

यावरही चाहते हार्दिक पांड्यावर भडकले आहेत. त्याच्या वागण्या-बोलण्यावर टीका केली. लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. आधी तुम्ही इथे दिलेला तो व्हायरल व्हिडिओ बघा, मग तुम्हाला सांगा लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत.

गुवाहाटी येथील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ईडन गार्डन येथे मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला. भारताने या सामन्यासाठी युजवेंद्र चहल याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली. श्रीलंकेला पुन्हा एकदा या सामन्यात सुरुवात देण्याचा प्रयत्न अविष्का फर्नांडो व पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडो यांनी केला. अविष्का वेगवान २० धावा काढून बाद झाला. त्यानंतर नुवानिदू व कुसल मेंडीस यांनी ७३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने पुढील पाच बळी केवळ २४ धावांमध्ये गमावले. कुलदीपने तीन तर उमरान मलिकने दोन बळी आपल्या नावे केले.

हेही वाचा: IND vs SL: “रोहित शर्मा हा रिकी पाँटिंगपेक्षा श्रेष्ठ फलंदाज…”, हिटमॅनची तुलना दोन दिग्गज एकमेकांमध्ये भिडले

मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांना फारसे यश मिळाले नाही. श्रीलंकेच्या खालच्या फळीतील जवळपास सर्वच फलंदाजांनी योगदान दिले. हसरंगाने २१, करूणारत्नेने १७, वेललागेने ३२ व कसून रजिथाने नाबाद १७ धावांचे योगदान दिले. भारतासाठी कुलदीप यादव व मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ तर मलिकने दोन बळी मिळवण्यात यश मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 17:45 IST

संबंधित बातम्या