Hardik Pandya- Ishan Kishan Dance Video: जगातील सर्वात मोठ्या मैदानावर न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९६ धावांनी मोठा विजय मिळवला. यासह लागोपाठ दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला. भारताने आतापर्यंत ३ वेळा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. इतर कुठल्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने धुमाकूळ घातल्यानंतर, भारतीय संघाने वर्ल्डकप विजयानंतर जोरदार जल्लोष केला. हार्दिक पांड्या आणि इशान किशनने तिरंगा हाती घेऊन मैदानावर भन्नाट डान्स केला. या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सेलिब्रेशन दरम्यान अदिती हुंडिया आणि महिका शर्मा देखील डान्स करताना दिसून आले. अदिती हुंडिया आणि इशान किशन दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याआधी इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमी फायनल सामन्यातही ती भारतीय संघला सपोर्ट करताना दिसून आली होती. मुख्यत: इशान किशनला. या सामन्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच तिचं नाव इशान किशनसोबत जोडलं जाऊ लागलं आहे.

तर महिका शर्मा ही हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत ती अनेकदा हार्दिक पांड्यासोबत दिसून आली आहे. भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी तिने अनेकदा स्टँड्समध्ये हजेरी लावली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर महिका शर्माने देखील हार्दिक पांड्यासोबत डान्स केला.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २५५ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर इशान किशन आणि अभिषेक शर्माने दमदार अर्धशतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला.