बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्ध होम सीरीजची योजना आखली होती, परंतु काही वृत्तानुसार, व्यस्त वेळापत्रकामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड मायदेशात होणारी ही मालिका रद्द करण्याचा विचार करत होते, परंतु आता अशी शक्यता आहे की भारताचा युवा संघ अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात मालिका खेळू शकतो. या मालिकेसाठी वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मासह सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, त्यात विराट कोहलीचाही समावेश आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने असा निर्णय घेतला आहे. कारण, हे सर्व खेळाडू यापूर्वी आयपीएल २०२३ मध्ये खेळले होते आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय २०-३० जून दरम्यान काही वेळ असल्याने अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट बोर्ड ही मालिका लहान स्वरुपात आयोजित करू शकते किंवा तिचे रूपांतर केवळ टी२० किंवा एकदिवसीय मालिकेत करू शकते आणि या मालिकेत हार्दिक पांड्या कर्णधार असेल. भारताचा दुसरा संघ म्हणजेच युवा खेळाडूंना संधी देऊन ही मालिका खेळली जाणार आहे.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइज अश्रफ हे आयपीएल फायनलसाठी भारतात आले असून आशिया चषक २०२३ तसेच भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील प्रस्तावित क्रिकेट मालिकेबाबत आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्यांची बैठक होणार आहे. माहितीसाठी, आयपीएल २०२३मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा: IPL2023: एमआय पलटणसाठी १२ षटके महत्त्वाची! गुजरातविरुद्ध मुंबई इंडियन्सची काय आहे रणनीती? जाणून घ्या

आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. तसेच, प्रशिक्षक कर्मचारी आणि संघातील काही सदस्य ७ जूनपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत, त्यानंतर टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौर्‍याची तयारी केली आहे.

भारत १२ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी२० सामने खेळणार आहे, त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळू शकतो. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत आयपीएल २०२३ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते आणि हार्दिक पांड्याला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

हेही वाचा: GT vs MI Qualifier 2: रोहित-राशिदमध्ये रंगणार रोमांचक मुकाबला, ‘मिस्टर ३६०’च्या विरुद्ध करामती खान कोणती योजना आखणार? जाणून घ्या

अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा संभाव्य १५ सदस्यीय भारतीय संघ

यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या (कर्णधार), जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहित शर्मा, अर्शदीप सिंग, उमरान मलिक मोहसीन खान