Hardik Pandya Gifts Car to Son and EX wife: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळत आहे. विश्वचषकाबरोबरच हार्दिक त्याच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहे. हार्दिकने नुकताच त्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्माचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला, ज्याचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. यादरम्यान त्याने पहिली पत्नी नताशा स्टँकोविक व मुलगा अगस्त्य पंड्याला एक खास कार भेट दिली आहे. ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या कारची किंमत नेमकी किती आहे, जाणून घेऊया.
हार्दिक पंड्या आणि सर्बियन अभिनेत्री नताशा स्टँकोविक वेगळे झाले असले तरी ते त्यांचा मुलगा अगस्त्य याला लहानचं मोठं दोघेही एकत्र करत आहेत. आता, हार्दिक आणि नताशा पुन्हा एकदा त्यांच्या करोडो किमतीच्या आलिशान कारमुळे चर्चेत आहेत.
हार्दिक पंड्याने ४ कोटींची लक्झरी कार लेकाला दिली भेट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये, नताशा स्टँन्कोविक काळ्या रंगाच्या नव्या लक्झरी कारसमोर दिसत आहे. फोटोंमध्ये तिचा मुलगा अगस्त्य देखील तिच्यासोबत दिसत होता. नताशा आणि अगस्त्यला हार्दिक पंड्याने हाय-एंड लँड रोव्हर डिफेंडर कार भेट दिली आहे. त्याची किंमत व्हेरिएंट आणि कस्टमायझेशननुसार ३ ते ४ कोटींदरम्यान असण्याचा अंदाज आहे. हार्दिकने ही आलिशान कार त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि मुलासाठी खरेदी केली आहे.
खास गोष्ट म्हणजे नताशा नव्या कारची चावी घेत असताना त्याच्या बाजूला एका स्टँन्डीवर अगस्त्यचा फोटो आहे आणि त्यावर लिहिलं आहे की पप्पांकडून अगस्त्यसाठी भेट, त्यावरूनच हे स्पष्ट झालं की ही खास भेट हार्दिक पंड्याने दिली आहे. हे फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर चाहत्यांनी या दोघांच्या को-पॅरिंटिंगचं कौतुक केलं. हार्दिक पंड्या भलेही लेकाबरोबर राहत नसला तरी त्याची काळजी मात्र तो घेत आहे, असंही चाहते म्हणाले.
जुलै २०२४ मध्ये अधिकृतपणे वेगळे झाले असले तरी, हार्दिक पंड्या आणि नताशा स्टँन्कोविक त्यांचा मुलगा अगस्त्यची जबाबदारी पार पाडत आहेत. हार्दिक पंड्याने हल्लीच माहिका शर्माबरोबर आपल्या नात्याची कबुली सोशल मीडियावर दिली होती. हार्दिकला चिअक करण्यासाठी माहिका स्टेडियममध्ये कायम उपस्थित असते. तर नताशा स्टँन्कोविक तिच्या करिअर आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे.
