Hardik Pandya Girlfriend Mahieka Sharma Angry On Paparazzi: आयपीएल २०२६ स्पर्धेला दमदार सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा मुंबईचा या हंगामातील पहिलाच सामना होता, त्यामुळे आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड महिका शर्माने देखील हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली होती. दरम्यान सामना झाल्यानंतर महिका शर्माचा अगस्त्य पंड्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना झाल्यानंतर, महिका शर्मा आणि अगस्त्य स्टेडियमच्या बाहेर निघताना दिसून येत आहेत. सध्या महिका शर्मा तुफान चर्चेत आहे. त्यामुळे ती जिथे जिथे जाते, तिथे पापाराझी तिला फॉलो करताना दिसतात. वानखेडे स्टेडियमबाहेरही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. ज्यावेळी महिका शर्मा आणि अगस्त्य स्टेडियमच्या बाहेर आले,त्यावेळी त्यांना पापाराझींनी घेरलं. कॅमेरा आणि फ्लॅशमुळे अगस्त्य घाबरला होता. पण महिका त्याचा बचाव करण्यासाठी धडपड करताना दिसून आली. यासह तिने पापाराझींना झापलं आणि बाजूला होण्यास सांगितलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.काहींनी ‘क्यूट..’अशी प्रतिक्रिया दिली आहे. महिका शर्मा ही हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. आधी हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर २०२५ मध्ये दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. भारतीय संघ जिथे जिथे सामना खेळण्यासाठी जातो, महिका तिथे हार्दिकच्या सावलीसारखी त्याच्या पाठिशी उभी राहते. यासह ती अगस्त्यची देखील काळजी घेताना दिसते. याआधी टी-२० वर्ल्डकप दरम्यानही ती अगस्त्यची काळजी घेताना दिसून आली होती.
मुंबईचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. कोलकाताकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर अंगकृष रघुवंशीने ५१ धावा केल्या. तर फिन अॅलेनने ३७ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांअखेर ४ गडी बाद २२० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रायन रिकल्टनने ८१ धावांची दमदार खेळी केली. तर रोहित शर्माने ७८ धावा कुटल्या. तिलक वर्माने शेवटी २० धावा केल्या. हा सामना मुंबई इंडियन्सने ६ गडी राखून नावावर केला.
