scorecardresearch

Hardik Pandya Meets Amit Shah: हार्दिक पांड्याने अमित शहांची घेतली भेट; सोशल मीडियावर शेअर केले भेटीचे फोटो

Hardik Pandya Meets Amit Shah: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळाणर आहे.

Hardik Pandya Meets Amit Shah: हार्दिक पांड्याने अमित शहांची घेतली भेट; सोशल मीडियावर शेअर केले भेटीचे फोटो
हार्दिक पांड्या आणि अमित शहांची भेट (फोटो सौजन्य-ट्विटर)

हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख खेळाडू आहे. तो श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने अलीकडेच पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. याआधी हार्दिक पांड्याने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे, ज्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हार्दिक पांड्याने शनिवारी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. दोन्हीमध्ये तो आणि त्याचा मोठा भाऊ अमित शहा यांना भेटताना दिसत आहे. पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आणि आमच्यासाठी मौल्यवान वेळ काढल्याबद्दल मी गृहमंत्री अमित शाहजींचा आभारी आहे. तुम्हाला भेटणे हे एक सौभाग्य आहे.’

कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या मोसमात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले –

२९ वर्षीय हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष खूप चांगले गेले. त्याच वर्षी, त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामात आयपीएल चॅम्पियन बनवले. २०२२ मध्ये त्याच्याकडे तिसऱ्यांदा भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. हार्दिकने आयपीएलच्या १५ व्या मोसमात बॉल आणि बॅटने थैमान घातले होते. त्याने ४ अर्धशतकांसह एकूण ४८७ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – Indian Team Schedule: टीम इंडिया नवीन वर्षात ‘या’ संघांचा करणार सामना; खेळाडूंसाठी असणार अतिशय व्यस्त कार्यक्रम

हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयर्लंड आणि न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकली –

हार्दिक पांड्याने यावर्षी जूनमध्ये पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले. जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर त्याने टी-२० संघाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर टीम इंडियाने नुकताच त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा दौरा केला होता. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही दौऱ्यांवर टी-२० मालिकेत संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 15:01 IST

संबंधित बातम्या