भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्याने हार्दिकची भारत अ संघात निवड करण्यात आली होती. भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळत आहे. नडगीला दुखापत झाल्याने हार्दिक या मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या दुखापतीमुळे हार्दिक न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी फिट होऊ शकतो का याबाबत साशंकता आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान असल्यामुळे हार्दिक संघाला संतुलन मिळवून देतो. त्याच्यामुळे संघाला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येतो. तडाखेबंद फटकेबाजी करणारा फिनिशर, गरज पडल्यास मोठी खेळी करू शकणारा फलंदाज, नवा तसंच जुना चेंडू हाताळू शकणारा गोलंदाज, भागीदारी फोडण्यात माहीर, डावात कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करू शकण्याची क्षमता आणि अफलातून क्षेत्ररक्षक. याबरोबरीने नेतृत्वाचाही अनुभव. यामुळे हार्दिकचं संघात असणं अनेकअर्थी महत्त्वाचं आहे.

हार्दिक वारंवार दुखापतग्रस्त होत असल्याने फक्त त्याचं नव्हे तर संपूर्ण संघाचं नुकसान होत आहे. हार्दिक खेळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर संघव्यवस्थापनाला दोन खेळाडू तयार करावे लागतात. हार्दिक नसण्याचा मोठा फटका संघाला बसतो. सीम बॉलिंग ऑलराऊंडर ही दुर्मीळ प्रजात आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग यांच्याबरोबरीने हार्दिक गोलंदाजी करतो. विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुबमन गिल यांच्या बरोबरीने फलंदाजी करतो. मैदानात ३० गज वर्तुळात असो किंवा सीमारेषेनजीक- हार्दिकचा वावर अतिशय चपळ असतो. असा ३६० डिग्री खेळाडू असणं संघाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. अँड्यू फ्लिनटॉफ, इयन बोथम, जॅक कॅलिस, बेन स्टोक्स जे काम करायचे ते काम हार्दिक भारतीय संघासाठी करतो पण दुर्देवाने शरीराची साथ नसल्यामुळे हार्दिक सलग खेळू शकत नाही. दुखापतींच्या ससेमिऱ्यामुळे हार्दिक कसोटी क्रिकेटमध्येही फार खेळत नाही. हार्दिकने ११ टेस्ट, ९४ वनडे आणि १३८ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. दुखापतींचा विळखा नसता तर हार्दिकने भारतासाठी खेळलेल्या सामन्यांची संख्या जास्त असती तसंच किमान एका प्रकारात तरी तो कर्णधार झाला असता.

२०२३ वनडे वर्ल्डकप भारतीय संघासाठी दुस्वप्न होतं. भारतीय संघ झंझावाती फॉर्मात होता. मात्र फायनलच्या मुकाबल्यात ऑस्ट्रेलियाने सरस खेळ करत बाजी मारली.

२०२३ वर्ल्डकप दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त. गोलंदाजी करताना डाव्या घोट्याला दुखापत. लिगामेंट टिअर. मायक्रोफ्रॅक्चर. गोलंदाजी करताना रनअपमध्येच दुखापतग्रस्त. बांगलादेशविरुद्धची लढत प्राथमिक फेरीची होती. हार्दिक संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला. वर्ल्डकपच्या पाच लढतीत भारतीय संघाला हार्दिकविनाच खेळाव्या लागल्या. सेमी फायनल आणि फायनलमध्ये हार्दिकची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

ऑस्ट्रेलियाचा संघ टी२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर होता. वर्ल्डकप काळात झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी रिहॅब प्रक्रिया सुरू असल्याने तो या मालिकेत खेळू शकला नाही.

डिसेंबर २३ जानेवारी २४ या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. रिहॅब प्रक्रिया सुरूच असल्याने हार्दिकचा या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेसाठी विचार झाला नाही.

जानेवारी २०२४ मध्ये अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर होता. रिहॅब सुरू असल्याने निवडीसाठी विचार झाला नाही.

ऑगस्ट २०२४- भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. वैयक्तिक कारणास्तव आणि वर्कलोड मॅनेजमेंट यामुळे हार्दिक या मालिकेत खेळला नाही.

फेब्रुवारी २०२५- इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर होता. वर्कलोड आणि फिटनेस मॅनेजमेंट. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर बॉलिंग वर्कलोडच्या कारणास्तव निवड नाही.

सप्टेंबर २०२५- आशिया चषक फायनल. डाव्या क्वॅड्रिसेप्स स्ट्रेन. सुपर ४ स्टेज गटाच्या लढतीत दुखापत

ऑक्टोबर २०२५- भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. क्वॅड्रिसेप्स दुखापत रिहॅब सुरू. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर

नोव्हेंबर २०२५- दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा. रिहॅब सुरूच.

मे २०२६- आयपीएल २०२६. बॅक स्पॅझ्ममुळे (पाठीत उसण भरल्याने) प्राथमिक फेरीचे ४ सामने खेळू शकला नाही.

जून २०२६- अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असताना क्वॅड्रिसेप्स (मांडीच्या पुढचे चार स्नायू) स्ट्रेन दुखापत.

जुलै २०२६- भारताचा आयर्लंड दौरा. रिहॅब प्रक्रिया सुरू.

जुलै २०२६- भारताचा इंग्लंड दौरा. रिहॅब सुरू

ऑगस्ट २०२६- भारताचा झिम्बाब्वे दौरा. रिहॅब आणि वर्कलोड मॅनेजमेंट. दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी निवड नाही

सप्टेंबर २०२६- अफगाणिस्तानचा भारत दौरा. डाव्या पायाला दुखापत. बंगळुरूस्थित सेंटर ऑफ एक्सलन्स इथे सरावादरम्यान दुखापतग्रस्त

सप्टेंबर ऑक्टोबर २०२६- वेस्ट इंडिज संघाचा भारत दौरा. वनडे क्रिकेटमध्ये अजूनही १० षटकांचा स्पेल टाकण्यासाठी सक्षम नसल्याने निवड नाही. राष्ट्रीय संघाऐवजी भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध मालिकेसाठी निवड.

सप्टेंबर ऑक्टोबर २०२६- नडगीला झालेल्या दुखापतीमुळे भारत अ संघातून बाहेर. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठीही साशंक.