scorecardresearch

सुट्टीवर असलेला हार्दिक पांड्या बायकोकडून घेतोय डान्सचे धडे, पाहा व्हिडीओ

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संध्या सुट्टीवर असून आपल्या पत्नीकडून डान्सचे धडे घेतोय.

सुट्टीवर असलेला हार्दिक पांड्या बायकोकडून घेतोय डान्सचे धडे, पाहा व्हिडीओ
हार्दिक पांड्या त्याच्या पत्नीकडून डान्सचे धडे घेत आहे.(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या सुट्टीवर आहे. नुकताच तो दुबईत माजी कर्णधार एमएस धोनीसोबत डान्स करताना दिसला होता. त्यानंतर हार्दिक पांड्याने आता एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या आपली पत्नी नताशा स्टॅनकोविककडून डान्सच्या काही स्टेप्स शिकत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडत आहे.

अलीकडेच हार्दिक पांड्याचा एमएस धोनीसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याचवेळी हार्दिकने नतासासोबतचा एक डान्स व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. खरंतर तो त्याच्या बायकोकडून काही डान्स स्टेप्स शिकतोय. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की नतासा तिचा पती हार्दिकला स्टेप बाय स्टेप शिकवत आहे, हार्दिकही पत्नीची नक्कल करत नाचत आहे. त्याच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

हार्दिक पांड्या नुकताच न्यूझीलंड दौऱ्यावरून परतला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली तसेच इतर अनेक खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यादरम्यान हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याचवेळी हार्दिकने तीन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती. या मालिकेतील दोन सामन्यांना पावसाचा फटका बसला होता.

हेही वाचा – सूर्यकुमार यादवला ‘या’ दोन इनिंग आवडतात सर्वात जास्त; त्यातील एक, तर पुन्हा पुन्हा पाहतो

विशेष म्हणजे, संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याला संघाचा टी-२० पूर्णवेळ कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. रोहित शर्मालाही हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाबाबत कोणतीही अडचण नाही असे वाटते. त्याचबरोबर असे मानले जात आहे की आगामी काळात हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये संघाची धुरा सांभाळू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:11 IST

संबंधित बातम्या