Who Did Natasha Date Before Hardik Pandya : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्नाच्या ४ वर्षानंतर दोघांच्या संमतीने घटस्फोट घेतला. हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर घटस्फोटाची घोषणा केली. त्यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकत्रित निवेदन जारी करून विभक्त होण्याच्या त्यांच्या निर्णयाची पुष्टी केली. हार्दिक पंड्यापूर्वी नताशा टीव्ही अभिनेता अली गोनीला डेट करत होती. दोघांनी एका टीव्ही शोमध्ये त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होती.
नताशा स्टॅनकोविकने अली गोनीला करायची डेट –
नताशा स्टॅनकोविक आणि अली गोनी ‘नच बलिए’ सीझन नऊमध्ये एकत्र दिसले होते. ‘नच बलिए’ हा कपल डान्स शो आहे. या शोच्या नवव्या हंगामात स्पर्धक म्हणून सहभादगी झाले होते. त्यावेळी नताशा आणि हार्दिकचे नाते सार्वजनिक झाले नव्हते. नच बलिए शोच्या एका एपिसोडमध्ये अहमद खानने अली आणि नताशा या दोघांना त्यांच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारला होता. त्याने विचारले, ‘तुमचे ब्रेकअप होऊन पाच वर्षे झाली की, पाच वर्षांनी तुम्ही ब्रेकअप केला?’ यावर अली म्हणाला, ‘नाही, आमचे ब्रेकअप होऊन चार वर्षे झाली आहेत.’ यावेळी नताशा पण म्हणाली होती की हो आमचे ब्रेकअप चार वर्षे झाली होती.
अली गोनीने यावेळी सांगितले की, ब्रेकअप झाल्यानंतरही तो नताशाला भेटत राहतो. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपला किती वेळ झाला हे ते विसरतात. त्यानंतर नताशा म्हणाली की, तिचे पाच वर्षांत दोनदा ब्रेकअप झाले. विभक्त होऊनही ते पुन्हा पुन्हा एकत्र येत असत. ब्रेकअपचे कारण सांगताना अली गोनी म्हणाला होता की, ‘वेगळ्या संस्कृतीमुळे आम्हाला वेगळे व्हावे लागले आणि मला एका भारतीय मुलीसोबत राहायचे होते.’ अली गोनीपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट केले. त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि काही महिन्यांतच ते दोघे वेगळे झाले.
हेही वाचा – Hardik Pandya : घटस्फोट आणि कर्णधारपदाच्या हुलकावणीनंतर हार्दिकची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कधीकधी मन…’
२०१८ मध्ये एका नाईट क्लबमध्ये भेटले होते –
हार्दिक आणि नताशाचे लग्न २०२० मध्ये झाले होते. दोघेही पहिल्यांदा २०१८ मध्ये एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. दोघांचे अनेक कॉमन मित्र होते. या काळातील किस्सा खुद्द हार्दिकनेच सांगितला होता. तो म्हणाला होता की, “नताशाला मी कोण आहे याची कल्पना नव्हती. तिने मला एका टोपीमध्ये पाहिले होते जिथे आम्ही भेटलो होतो. मी रात्री एक वाजता टोपी, गळ्यात चेन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी बोलू लागलो होतो.
नताशाचे हार्दिकशी दोनदा लग्न –
त्यानंतर या जोडप्याने २०२० मध्ये त्यांच्या इंगेजमेंटची घोषणा केली. १ जानेवारी २०२० रोजी एका क्रूझ पार्टीत हार्दिकने नताशाशी लग्न केले. यानंतर, त्यांनी कोविड काळात ३१ मे २०२० रोजी कोर्टात लग्न केले. ३० जुलै २०२० रोजी हे जोडपे त्यांच्या मुलाचे म्हणजे अगस्त्यचे पालक झाले. यानंतर २०२३ मध्ये नताशा आणि हार्दिकचे भव्य लग्न केले. त्यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने दोनदा लग्न केले. या जोडप्याचा २ वर्षांचा मुलगाही लग्नाला उपस्थित होता. पण मार्च २०२४ मध्ये त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येऊ लागल्या.
© IE Online Media Services (P) Ltd