scorecardresearch

हार्दिक-नताशा होणार आई-बाबा; गुपचूप उरकलं लग्न?

हार्दिकने सोशल मीडियावरून दिली माहिती

hardik-natasa-
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच यांचे प्रेम प्रकरण नेहमीच चर्चेत असते. तशातच आता नताशा आणि हार्दिक हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी रविवारी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले आणि गोड बातमी सांगितली. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरच्या घरी लग्न केल्याचाही फोटो शेअर केला आहे, पण त्याबद्दल त्याने माहिती दिली नसल्याने या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा आहे.

हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच आहे तरी कोण?

हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नताशा गरोदर असून हार्दिकने अगदी प्रेमाने तिच्या पोटाजवळ हात धरून ते दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे. हार्दिकने लिहिले आहे की मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास उआनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, असेही त्याने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने १ जानेवारी २०२० ला आपली प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिच्याशी साखरपुडा केला. तेव्हापासून तिचं नाव सगळीकडे चांगलंच चर्चेत होतं. नताशा जरी मूळची सर्बियन असली तरी सध्या ती मुंबई-स्थित मॉडेल आहे. नताशा अभिनेत्री बनण्यासाठी २०१२ साली मुंबईमध्ये आली. प्रसिद्ध संगीतकार बादशाहच्या ‘डीजेवाले बाबू’ या म्युझिक व्हिडीओमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली. हार्दिक आणि नताशा रिलेशनशीपमध्ये आहेत अशी चर्चा गेले अनेक दिवस होती. १ जानेवारी २०२० रोजी या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी नात्याला आकार दिला. मात्र अद्याप हार्दिक-नताशा लग्न कधी उरकलं याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hardik pandya natasa stankovic expecting their first child instagram post marriage vjb

ताज्या बातम्या