Hardik Pandya Salute to Army Officer ahead IND vs ENG 1st ODI : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात, मात्र सुरक्षा आणि गर्दीमुळे त्यांना चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करणे त्याला शक्य होत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये अंतर कायम आहे, पण तरीही त्यांना अपार प्रेम मिळते. खेळाडूंनाही हे समजते. त्यामुळे क्रिकेटपटूंनी केलेली छोटीशी गोष्टही चाहत्यांना खूश करण्यासाठी पुरेशी असते. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने असेच काहीसे केले आहे.

हार्दिक पंड्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी नागपूरला रवाना होत असताना विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लष्कराच्या जवानाला त्याने सलामी दिली आणि हस्तांदोलन केले. आर्मी मॅनसोबत हार्दिक पंड्याचे हे वागणे पाहून चाहतेही आता सोशल मीडियायवरुन त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती.

भारतीय संघाच्या पाचही टी-२० सामन्यांमध्ये तो मैदानावर दिसला. या कालावधीत त्याने फलंदाजीत २१४ धावा केल्या, त्यात एका अर्धशतकाचाही समावेश होता. याशिवाय गोलंदाजीतही त्याच्या नावावर पाच विकेट्स होत्या. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्या एकदिवसीय मालिकेत आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक –

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारीला कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १०७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ५८ सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले असून तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंडचा एकदिवसीय संघ :जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, फिलिप सॉल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशीद, मार्क वुड.

Story img Loader