Hardik Pandya Instagram Post on Fitness Amid T20 Captain Selection: हार्दिक पंड्यासाठी गेले काही महिने चढ-उतारांनी भरलेले आहेत. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये त्याला दुखापत झाल्याने तो थेट आणि टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघात परतला. तत्तपूर्वी पंड्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून परतला. हा मोसम मुंबई इंडियन्ससाठी मैदानावर आणि मैदानाबाहेरही खूपच खराब होता. त्यानंतर २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत चॅम्पियन झाला आणि पंड्या या विजयाचा हिरो ठरला होता. यासह तो भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असेल अशी चर्चा होती, पण सूर्याचे नाव या शर्यतीत पुढे आहे. पण यादरम्यान आता हार्दिकने एक अशी पोस्ट केली आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा – Team India: रोहित शर्मा आणि गौतम गंभीरची कर्णधार म्हणून सूर्यकुमारच्या नावाला पसंती?
रोहित शर्माच्या टी-२० आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर हार्दिक पंड्याचा फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून विचार केला जात होता, पण तसे होताना दिसत नाही. हार्दिक पंड्याला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत दुखापतींचा सामना करावा लागला आहे. सूर्यकुमार यादव आता भारताचा कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार आहेत. दरम्यान, हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा – Natasa Stankovic: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा स्टॅनकोविकने लेकासह सोडलं घर, एअरपोर्टवरील VIDEO आला समोर
Hardik Pandyaची फिटनेस पोस्ट व्हायरल
सूर्याच्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने पूर्वीचा आणि आताचा असे दोन फोटो शेअर केले आहेत. हार्दिके या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, २०२३ च्या विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर हा प्रवास खूप कठीण होता पण टी-२० विश्वचषकाच्या विजयामुळे या मेहनतीचं फळ मिळाल. आपण मेहनत करत राहिल्यास त्याचा परिणाम नक्कीच दिसून येतो. ही पोस्ट फिटनेससाठी असली तरी पंड्यासाठी किती चढ-उतारांचे दिवस होते हे ही या पोस्टवरून कळते. श्रीलंका दौऱ्यावर तो फक्त टी-२० मालिका खेळणार असल्याचे वृत्त आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही.
हेही वाचा – IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा संघाचा भाग असणार? समोर आली मोठी अपडेट
श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यापूर्वी हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आहे. हार्दिक टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधारही होता, त्यामुळे त्याचा पुढील टी-२० कर्णधार म्हणून विचार केला जात होता, पण त्याच्या दुखापती आणि फिटनेसमुळे आता अचानक सूर्यकुमार यादवचे नाव पुढे आले. त्यानंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक मागे पडला आहे. यादरम्यान त्याची फिटनेस पोस्ट हे कर्णधारपदाच्या चर्चेला उत्तर मानले जात आहे. कारण या शर्यतीत हार्दिक त्याच्या फिटनेसमुळे मागे पडला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd