भारतीय संघाचा तडाखेबाज अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या हा त्याच्या फटकेबाजीमुळे कायम मैदान गाजवतो. नुकतीच त्याने ३७ चेंडूत शतकी खेळी केल्याने तो चर्चेत आला होता. या चर्चा थांबण्याआधी हार्दिकने एक नवा पराक्रम केला. हार्दिक पांड्याने डॉ. डी वाय पाटील टी २० स्पर्धेत खेळताना तुफानी खेळी केली. सध्या तो डॉ डी वाय पाटील टी २० स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळत आहे. या संघाकडून खेळताना त्याने ५५ चेंडूत नाबाद १५८ धावांची खेळी केली.

“पंतला संघात घेण्याची बुद्धी कोणाला झाली होती?”

दुखापतीमुळे गेले कित्येक महिने क्रिकेटपासून दूर होता. पण क्रिकेटच्या मैदानात त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून ‘कमबॅक’ केले. तेव्हापासून तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. शुक्रवारी रिलायन्स वन विरूद्ध बीपीसीएल असा सामना रंगला. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाबाद दीडशतकी खेळी केली. या खेळीत हार्दिकने २० उत्तुंग षटकार खेचले. त्याच्या दमदार खेळीच्या बळावर रिलायन्स वनने ४ बाद २३८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बीपीसीएल संघाचा डाव १३४ धावांत आटोपला आणि रिलायन्स वनने सामना १०४ धावांनी जिंकला.

Video : पांड्या Returns! १० उत्तुंग षटकारांसह ३७ चेंडूत ठोकलं शतक

४ सामन्यात ३८ षटकार, ३४७ धावा

हार्दिक पांड्याने डॉ. डी व्हाय पाटील टी २० स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यात त्याने पहिल्या सामन्यात ४ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. यानंतर दुसर्‍या सामन्यात पांड्याने १० षटकारांच्या मदतीने १०५ धावा फटकावल्या. या सामन्यात त्याने ३७ चेंडूत शतक पूर्ण केले होते. तिसर्‍या सामन्यात पांड्याने पुन्हा ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. तर चौथ्या सामन्यात त्याने २० षटकारांच्या मदतीने १५८ धावा केल्या. त्यानुसार पांड्याने चार सामन्यात ३८ षटकारांच्या मदतीने ३४७ धावा केल्या आहेत.