Hardik Pandya Statement on MI Defeat vs KKR: कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील अजून एक सामना गमावला. मुंबईने केकेआरचा ४ विकेट्सने पराभव केला आणि प्लेऑफमधील शर्यतीत संघाने आपलं स्थान कायम ठेवलं आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करत फक्त १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने १८.५ षटकांत सामना आपल्या नावे केला. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने कोणावर पराभवाचं खापर फोडलं, जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आधीच बाहेर झाला असला तरी संघ प्रतिष्ठेसाठी सामने खेळत आहेत. हार्दिक पंड्या २ सामन्यांनंतर पुन्हा संघात परतला, पण त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवण्यात संघ पुन्हा अपयशी ठरला. हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने सलग चौथा सामना गमावल आहे. या सामन्यात संघाची फलंदाजी बाजू कोसळल्याने त्याचा संघाला मोठा फटका बसला.

संघाने २० धावा कमी केल्या काय वाटतं, यावर हार्दिक म्हणाला, “हो, सामना खूप रंगतदार झाला. पण फलंदाजी गट म्हणून पाहिलं तर आम्ही निश्चितच १५-२० धावा कमी केल्या. पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट्स गमावल्या. जर मी आणि तिलक वर्मा दोघंही आणखी थोडा वेळ खेळलो असतो आणि भागीदारी रचली असती तर त्या अतिरिक्त १५-२० धावा मिळाल्या असत्या. मग कदाचित आमच्याकडे सामना जिंकण्याची चांगली संधी होती.”

हार्दिक पंड्या मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

खेळपट्टीबद्दल हार्दिक म्हणाला, “खरं सांगायचं तर मला अशा खेळपट्टीवर खेळायला आवडतं, जिथे गोलंदाजांनाही काहीतरी मदत मिळते. सध्या आयपीएल खूप फलंदाजांच्या बाजूने झुकलेलं दिसतंय आणि गोलंदाज अनेकदा हतबल दिसतात. पण आजच्या खेळपट्टीकडून गोलंदाजांनाही थोडी मदत मिळाली. त्यामुळे त्यांना चांगले चेंडू टाकण्याची संधी मिळाली आणि फलंदाजांनाही चांगलं क्रिकेट खेळून धावा कराव्या लागल्या. त्यामुळे मला हा सामना खूप आवडला.”

ड्रॉप कॅचेसबद्दल कॅप्टन म्हणाला, “मला नक्की माहित नाही, पण संपूर्ण हंगामात आमचं क्षेत्ररक्षण खूपच खराब राहिलं आहे. आम्ही अनेक झेल सोडले आणि अर्थातच कुणालाही असं करायचं नसतं. पण या विभागात लपून चालत नाही. सामने जिंकायचे असतील, तर प्रत्येक संधीचा फायदा घेता यायला हवा. पण जेव्हा तुम्ही सामन्याचं चित्र बदलू शकणारे झेल सोडता, तेव्हा तुम्ही कायम सामन्यात मागे पडता.”

२०२६ हंगामाची सांगता चांगल्या पद्धतीने करण्याबद्दल हार्दिक म्हणाला, “हो नक्कीच. हा ‘ESA’ सामना आहे आणि तो मुलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. आमची एकच इच्छा आहे की मैदानात आलेल्या २५ हजार मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावं. त्यांनी आमचा खेळ पाहावा, आम्ही त्यांचं मनोरंजन करावं आणि त्यांना आनंद द्यावा. मला वाटतं, ही आठवण त्यांच्या आयुष्यात कायम राहील.” मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना वानखेडेच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरूद्ध असणार आहे.”