Asia Cup 2022 IND vs PAK: भारत- पाकिस्तानचा सामना म्हंटला की उत्साह, जल्लोष सुद्धा सोबत आलाच. आशिया चषकात रविवारी पार पडलेल्या सामन्यात सुद्धा असाच थरार पाहायला मिळाला. टीम इंडियाने सुरुवातीला जोरदार गोलंदाजी करत पाकिस्तानच्या एक एक खेळाडूला माघारी धाडले व अवघ्या २० षटकातील शेवटचा चेंडू खेळायची सुद्धा संधी दिली नाही, तर भारतीय फलंदाजांनी जोरदार चौकार- षटकार ठोकून स्वतःवर शेवटचा चेंडू खेळण्याची वेळच येऊ दिली नाही. या सामन्यात अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या खेळीसह एका खास व्हिडीओमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पांड्या आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलू जोडीने ५२ धावांची भागीदारी केली. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये सात धावा आवश्यक असताना, मोहम्मद नवाजने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जडेजाला बाद केले, यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी मैदानात उतरला. (India Beats Pakistan: भारताच्या विजयानंतर शाहीद आफ्रिदी हार्दिक पंड्याच्या खेळीवर फिदा; म्हणाला, “पंड्याने दोन्ही…”)

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights Match in Marathi
LSG vs CSK Highlights, IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय, राहुल-डी कॉकने झळकावले अर्धशतक
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…

झालं असं की, कार्तिकने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एकच धाव घेतली आणि हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्यालाच स्ट्राइक दिली. यावेळी तिसर्‍या चेंडूवर पांड्याला खेळता आले नाही, खेळ शेवटच्या टप्प्यात आल्याने अशावेळी चेंडू सोडणे महाग पडू शकते अशा भावनेने कार्तिकने पांड्याकडे पाहिले याचवेळी पांड्याने एकदम शांत प्रतिक्रिया देत मी आहे ना असं खुणावत कार्तिकला मागे जाऊन त्याच्या जागी थांबायला सांगितले.

अटीतटीच्या वेळी पांड्याचा हा कूल चेहरा पाहून नेटकरी भलतेच खुश झाले आहेत. पांड्याचा आत्मविश्वास बघून त्याने किती परफेक्ट नियोजन केले असणार याचा अंदाज येतो असे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे खरे सुद्धा आहे कारण हा एक चेंडू सोडताच पुढच्या चेंडूवर पांड्याने जबरदस्त षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

हार्दिक पांड्या Viral Video

दरम्यान, १७ चेंडूत नाबाद ३३* धावा व तीन गडी बाद करताना पांड्या कालच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला. विश्वचषकात ज्या मैदानावर भारताला जिव्हारी लागेल असा पराभव पत्करावा लागला होता त्याच मैदानावर पाकिस्तानला धूळ चरत टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला.