scorecardresearch

Hardik Pandya: WTC फायनलबाबत हार्दिक पांड्याचं मोठं विधान, म्हणाला, “कुणाच्या जागेवर मला खेळायचं…”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ चा फायनलचा सामना ७ जूनपासून खेळवण्यात येणार आहे.

Hardik Pandya Press Conference
हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेटबद्दल मोठं विधान केलं. (Image-Instagram)

Hardik Pandya Latest News : नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर २-१ ने आघाडी घेत कसोटी मालिका खिशात घातली. पण टी-२० भारताचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्याचा मात्र या कसोटी मालिकेत सहभाग नव्हता. मात्र, कसोटी क्रिकेटच्या करिअरबद्दल बोलताना हार्दिर पांड्याने मोठी प्रतिक्रिया दिलीय. “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आणि भविष्यात होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये सहभागी व्हायचं नाहीय. एखाद्या खेळाडूच्या जागेवर स्थान मिळवून मला खेळायचं नाहीय. मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी १० टक्केही मेहनत घेतली नाहीय. मी ऑगस्ट २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. “, असं पांड्याने नुकतच माध्यमांशी बोलताना म्हटलंय.

“ते माझ्यासाठी ठीक नसेल”, हार्दिक म्हणाला…

हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत म्हटलं, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर नाही…मी माझ्या आयुष्यात नैतिकरित्या खूप मजबूत आहे. मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी १० टक्केही काम केलं नाहीय. खरं सांगायचं झालं तर, माझा यात एक टक्काही सहभाग नाहीय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी जाणं आणि कुणाची जागा घेणं माझ्यासाठी चांगली गोष्ट नसेल.

हार्दिकने पुढं म्हटलं, “जर मला कसोटी सामना खेळायचा असेल, तेव्हा मी खूप मेहनत घेईल. मी स्वत:चं अस्तित्व निर्माण करेल आणि त्यानंतर पुनरागमन करेल. जोपर्यंत मला कसोटीतील स्थान पक्क झालंय, असं वाटत नाही, तोपर्यंत मी आगामी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात सहभागी होणार नाही.”

नक्की वाचा – IND vs AUS 1st ODI: राहुलने करून दाखवलं! कठीण परिस्थितीत ठोकलं नाबाद अर्धशतक, भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

हार्दिक पांड्याचा आंतरराष्ट्रीय करिअर
११ टेस्ट, ५३२ धावा, १ शतक आणि ४ अर्धशतक, १७ विकेट
७१ वनडे- १५१८ धावा, ९ अर्धशतक, ६८ विकेट
८७ टी २० – १२७१ धावा, ३ अर्धशतक, ६९ विकेट

भारत – ऑस्ट्रेलियात रंगणार ओव्हलमध्ये फायनल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ ची फायनल खेळवण्यात येणार आहे. हा सामना ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना खूप रोमांचक असेल, कारण भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC फायनल खेळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 22:37 IST
ताज्या बातम्या