‘हरलीन’च्या ‘त्या’ कॅचवर सचिन तेंडुलकरही फिदा; व्हिडीओ ट्वीट करून म्हणाला,…

Harleen Deol Super Catch Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या कॅचबद्दल हरलीनचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही

Harleen Deol Super Catch Video, Sachin tendulkar reaction, India vs England Women 1st T 20
अफलातून कॅचमुळे हरलीनचं प्रचंड कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही तिचं या कॅचबद्दल कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्याची जोरात चर्चा सुरू आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, क्रिकेटप्रेमी त्याला मनापासून दाद देताना दिसत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ आहे क्रिकेटपटू हरलीन देओल हिचा… या सामन्यादरम्यान हरलीनने अशक्य ते शक्य करून दाखवत झेल घेतला. या अफलातून कॅचमुळे तिचं प्रचंड कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही तिचं या कॅचबद्दल कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी झाला. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पण तरीही भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना अविस्मरणीय ठरला. या सामन्यात घेतलेल्या हरलीन देओलने घेतलेल्या कॅचमुळे क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. हरलीनने घेतलेल्या या कॅचची सगळीकडे चर्चा सुरू असून, तिला सुपर वुमन म्हटलं जात आहे. हरलीनच्या या कॅचवर सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा- Video : हरलीन देओलचा ‘तो’ सुपरकॅच व्हायरल; आनंद महिंद्रा म्हणतात, “हा स्पेशल इफेक्ट तर नाही ना?”

सचिन तेंडुलकरने हरलीनने कॅच घेतलेला व्हिडीओ ट्वीट करत तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. इतकंच नाही, तर माझ्यासाठी हा वर्षातील सर्वोत्तम झेल असल्याचंही तेंडुलकरने म्हटलं आहे. “हरलीन, तू घेतलेला झेल खूपच अप्रतिम होता. माझ्यासाठी हा वर्षातील सर्वोत्तम झेल आहे”, असे उद्गार सचिन तेंडुलकरने काढले आहेत.

१९व्या ओव्हरमध्ये काय झालं?

इंग्लंडची फलंदाजी करत असताना डावाची १९वी ओव्हर सुरू होती. १९व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर इंग्लंडच्या जोन्स अॅमीने जोरदार फटका मारला. त्यावेळी सीमेवर हरलीन क्षेत्ररक्षण करत होती. सीमेचा (बाऊंड्री लाईन) अंदाज तिने कॅच पकडला. बॉल सीमारेषेपार जात असताना तिने हवेत झेप घेत कॅच घेतली. पण सीमारेषेबाहेर जात असल्याचं लक्षात येताच तिने हवेत असतानाच बॉल सीमारेषेच्या आत फेकला आणि पुन्हा झेप घेत कॅच पकडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Harleen deol catch video sachin tendulkar reaction tendulkar tweet on harleen catch bmh