Women’s Premier League: महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचे दोन आठवडे खूप खास राहिले. आता चाहते बाद फेरीचे सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आतापर्यंत गेल्या काही आठवड्यांत परदेशी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. मेग लॅनिंग, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, एलिस पेरी आणि सोफी डिव्हाईन सारख्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली.भारतीय खेळांडूबद्दल बोलायचे, तर डब्ल्यूपीएलची सर्वात महागडी खेळाडू आणि आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करण्यात अपयशी ठरली आहे.

मात्र, या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणारे काही भारतीय आहेत. देशांतर्गत लीगमध्ये खेळताना, या भारतीय खेळाडूंनी घरच्या परिस्थितीचा फायदा घेतला आहे. तसेच त्यांच्या फ्रँचायझींसाठी दिग्गज म्हणून उदयास आल्या आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया

not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

१. शफाली वर्मा

१९ वर्षीय शफाली वर्माने तिच्या उत्कृष्ट फलंदाजीने WPL चाहत्यांना प्रभावित केले आहे. कर्णधार मेग लॅनिंगसह तिने संघाला दमदार सुरुवात करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. रॉयल चॅलेंजर्स (RCB) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात, तिने गोलंदाजांवर आक्रमक फलंदाजी करताना ८४ धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर चौथ्या सामन्यात शानदार केली. गुजरात जायंटसविरुद्ध अवघ्या २८ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. तिने सहा सामन्यांत दोन अर्धशतकांसह १८५.१४ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने १८७ धावा केल्या आहेत.

२. यास्तिका भाटिया

यास्तिका भाटियाने या स्पर्धेत आतापर्यंत मुंबई इंडियन्स (MI) कडून चांगली कामगिरी केली आहे. तिने सहा सामन्यांमध्ये ११३.४९ च्या स्ट्राइक रेटने १५८ धावा केल्या आहेत. तथापि, या उद्घाटन हंगामातील त्याची सर्वोत्तम खेळी अद्याप येणे बाकी आहे कारण त्याने आतापर्यंत आपल्या बॅटने एकही मोठी खेळी खेळलेली नाही.

भाटिया आणि मॅथ्यूज या सलामीच्या जोडीने एमआयला फायदा मिळवून दिला आहे. कारण कॅरेबियन फलंदाज तिच्या आक्रमक शैलीने धावा काढत असते, तेव्हा भाटिया संघाची दुसरी बाजू लावून धरते. तिने तिसर्‍या सामन्यात १२८.१३ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने केवळ ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासाठी शानदार खेळी केली. २२ वर्षीय खेळाडूने १५५.५६ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने २७ चेंडूत ४२ धावा केल्या. तसेच संघाला आठ गडी राखून विजय मिळवून देण्यात योगदान दिले.

हेही वाचा – IND vs AUS: भारताने नोंदवला वनडेतील सर्वात मोठा पराभव; ऑस्ट्रेलियाचा १० गडी राखून ऐतिहासिक विजय

३.जेमिमाह रॉड्रिग्ज –

जेमिमाह रॉड्रिग्जने तिच्या असामान्य फलंदाजी क्षमतेचा वापर करून डीसी संघात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा आणि फलंदाजीच्या पराक्रमाचा वापर करून ती मधल्या फळीत डीसीच्या फलंदाजीचा महत्वाचा भाग बनली. आपल्या पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध १५ चेंडूत २२ धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात २२ चेंडूत ३२ धावांची धमाकेदार खेळी खेळून डीसीला २११/४ धावसंख्या उभारुन दिली. तिच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर डीसीने यूपीचा ४२ धावांनी पराभव केला. या हंगामात आतापर्यंत तिने सहा सामन्यांच्या पाच डावांत १३१.०३ च्या स्ट्राइक रेटने ११४ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Suryakumar Yadav: वनडेत अपयशी ठरलेल्या सूर्याला गावसकरांनी दिला महत्वाचा सल्ला; म्हणाले, त्याला ‘या’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची गरज

४. हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. सध्या, एमआय पाच विजय आणि एका पराभवांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, एमआय बाद फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. कर्णधारपदासोबतच फलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे.

गुजरात जायंट्स (GG) विरुद्धच्या उद्घाटनाच्या WPL सामन्यात, शानदार अर्धशतक ठोकले. तिने फक्त ३० चेंडूत ६५ धावा करून एमआयला गुजरात जायंट्सविरुद्ध २०७ धावांचा डोंगर उभारुन दिला. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात देखील महत्वाची अर्धशत झळकावत महत्वाची भूमिका बजावली. तिने आतापर्यंत, सहा सामन्यांत १६६.६६ च्या स्ट्राइक रेटने २०५ धावा करून ती MI साठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.