Harmanpreet Kaur Statement on India Lords test win: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा लॉर्ड्स कसोटीत २७० धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. १४२ वर्षांत पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानावर महिलांचा कसोटी सामना खेळवला गेला आणि भारताच्या महिला संघाने विजय मिळवत बाजी मारली. सांघिक कामगिरीच्या बळावर भारताच्या महिला संघाने या विजयाची नोंद केली. यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष या फलंदाजांनी आणि गोलंदाजीत क्रांती गौड, स्नेह राणा व सायली सतघरे यांनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली, जाणून घेऊया.

इंग्लंडमध्ये जिथे भारताच्या महिला संघाने टी-२० विश्वचषकातील सामने गमावले आणि त्यानंतर आता तिथेच इंग्लंडमध्ये टीम इंडियाने कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला, याबद्दल हरमनला विचारण्यात आलं की तू यापेक्षा चांगली स्क्रिप्ट लिहू शकतेस का, अजिबात नाही. देवापेक्षा चांगला लेखक कोणीच असू शकत नाही. त्याने ही गोष्ट अतिशय सुंदर लिहिली आहे.

भारताच्या ऐतिहासिक कसोटी विजयाबाबत कर्णधार हरमनप्रीत काय म्हणाली?

स्मृती मानधनाने दिलेल्या दमदार सुरुवातीबद्दल हरमन म्हणाली, “आमच्या सलामीवीरांनीच संघाची सर्वात मोठी ताकद असल्याचं पुन्हा सिद्ध केलं आहे. त्यांनी डावाच्या पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहणं खरोखरच खास होतं. त्या नेहमी जबाबदारी स्वीकारतात आणि आमच्यावरील दडपण कमी करतात. या कसोटी सामन्यातही त्यांची फलंदाजी अप्रतिम होती.”

कमी कसोटी सामने खेळूनही भारताच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल हरमन म्हणाली, “संघाच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचं श्रेय संपूर्ण संघाच्या मेहनतीला आणि विशेषतः आमच्या सपोर्ट स्टाफला जातं. त्यांच्यापैकी अनेकांनी भरपूर कसोटी क्रिकेट खेळलं आहे. कसोटी क्रिकेटचा फ्लो कसा असतो, याची त्यांना उत्तम जाण आहे. ते प्रत्येक क्षणी आम्हाला योग्य मार्गदर्शन करत होते. त्यामुळेच आम्हाला चांगली कामगिरी करता आली. अमोल सर आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफने या कसोटीत तसेच याआधीच्या कसोटीत आम्हाला ज्या पद्धतीने साथ दिली, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते.”

अलीकडच्या निराशाजनक मालिकांनंतर संघाच्या पुनरागमनाबद्दल हरमन म्हणाली, “गेल्या काही मालिका आमच्या अपेक्षेप्रमाणे गेल्या नाहीत. पण अशा काळातच गोष्टी विस्कटण्याची शक्यता जास्त असते. त्या परिस्थितीत आमच्या सपोर्ट स्टाफने संपूर्ण संघाला एकत्र ठेवण्याचं मोठं काम केलं. याचं श्रेय पुन्हा एकदा अमोल सर आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफलाच द्यावं लागेल. इंग्लंडमधील हा दौरा आमच्या मनासारखा झाला नाही, पण कसोटी सामन्यात आम्ही जोरदार पुनरागमन केलं. आता भारतात परतताना आमच्यासोबत काही सुंदर आठवणी घेऊन जात आहोत, याचा मला खूप आनंद आहे.”