Harmanpreet Kaur Record As Captain: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. तिने तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावुक पोस्ट लिहिली आणि कर्णधारपद सोडत असल्याची माहिती दिली. तिने कर्णधारपद सोडलं असलं तरीदेखील ती संघातील अनुभवी फलंदाज म्हणून संघात कायम राहणार आहे. हरमनप्रीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय महिला संघाची पुढील कर्णधार कोण होणार? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. पण याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान हरमनप्रीत कौरने कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी काय काय केलं? जाणून घ्या.

भारतीय महिला क्रिकेट संघाने आजवर अनेक सामने जिंकले, मोठ्या संघांना पराभूत केलं, मालिका जिंकल्या. पण भारतीय संघाला एकदाही वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावता आली नव्हती. ही कामगिरी भारतीय संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळताना करून दाखवली. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्यानंतर झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. याआधीही भारतीय संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती. पण ट्रॉफी उंचावता आली नव्हती. ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळताना करून दाखवली.

काही दिवसांपूर्वीच आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाने फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. यासह ती सलग २ सुवर्णपदक जिंकून देणारी पहिलीच भारतीय कर्णधार ठरली.

कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरची कामगिरी…

१) कर्णधार म्हणून ४ वेळा आशिया चषक जिंकणारी पहिलीच कर्णधार

२) कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारी कर्णधार (९२ सामने)

३) २०२५ वर्ल्डकप जिंकून देणारी कर्णधार

४) भारतीय महिला कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारी कर्णधार (४ सामने

५) भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारी कर्णधार

६) कर्णधार म्हणून २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

७) कर्णधार म्हणून २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

८) कर्णधार म्हणून कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल

९) आयसीसी ट्रॉफी जिंकणारी पहिलीच महिला कर्णधार

१०) १५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व करणारी आणि २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिलीच खेळाडू.