WPL 2023 1st Match MIW vs GGW: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्याच सामन्यात २०० धावांचा टप्पा पार केला. मुंबईने २० षटकात ५ बाद २०७ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे.

मुंबई इंडियन्स कडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तिने ३९ चेंडूंच्या खेळीत १४ चौकार मारले. त्याचबरोबर तिने इतिहास रचला आहे. ती या स्पर्धेतील अर्धशतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने पहिल्याच डावात २०० धावांचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.

Rohit Sharma Ishan Kishan Romario Shepherd Gerald Coetzee Tim David contributed to MI win
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका
IPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सने रचले विक्रमांचे इमले
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 SRH vs CSK Highlights: चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने ६ विकेट्सने सहज जिंकला सामना
Rohit Sharma gifted special 200 jersey by Sachin Tendulkar
IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! सचिन तेंडुलकरकडून मिळालं खास गिफ्ट

त्याचबरोबर सलामीवीर हिली मॅथ्यूजने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. तसेच अमेलिया केरने २४ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. नताली सीव्हरने २३ आणि पूजा वस्त्राकरने १४ धावांचे योगदान दिले. यास्तिका भाटिया एक धाव काढून बाद झाली. इसी वँगने एका चेंडूत सहा धावा केल्यानंतर नाबाद राहिली. गुजरात जायंट्सकडून स्नेह राणाने सर्वाधिक दोन बळी घेतले. ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेरेहम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – WPL 2023 MI vs GG: कोण आहे १९ वर्षीय जिंतीमणी कलिता? जिच्यावर हरमनप्रीतने पहिल्याच सामन्यात दाखवला विश्वास

२०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या गुजरात जायंट्स संघाची सुरुवात खराब झाली. ४ षटकांच्या समाप्तीनंतर गुजरात संघाने ३ बाद ११ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी १६ षटकांत १९७ धावांची गरज आहे. नॅट सायव्हर-ब्रंटने २ आणि इस्सी वोंगने १ विकेट घेतली.

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार), सब्भिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षख), हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमणी कलिता, सायका इशाक