लुसाने : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत.

भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पीआर श्रीजेश आणि कर्णधार सविता पुनिया यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनाही नामांकन मिळाले आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

अंतिम पुरस्कारासाठी हरमनप्रीतची बेल्जियमच्या आर्थर डी स्लूवर, टॉम बून, जर्मनीच्या निक्लास वेलेन आणि नेदरलॅंड्सच्या थिएरी ब्रिंकमनशी स्पर्धा असेल. महिलांत सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी एकाही भारतीयाला नामांकन मिळाले नाही.

यंदाच्या नामांकनाचे वैशिष्टय़ म्हणजे हरनप्रीत, श्रीजेश आणि सविता यांना सलग दुसऱ्या वर्षी नामांकन मिळाले आहे. विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला करण्यात येईल.