नवी दिल्ली : विजयी क्रिकेटवीरांचे स्वागत नेहमीच पाहिले, पण आता आमचे असे जल्लोषात स्वागत झालेले पाहून काय बोलावे हेच सुचत नाही. अशा वेळी स्वत:चा अभिमान वाटतो आणि जबाबदारी वाढल्याची जाणीवदेखील होत असल्याची भावना कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने व्यक्त केली.

पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्यासाठी गोलरक्षक श्रीजेशला ध्वजवाहकाचा मान मिळाला आहे. यासाठी श्रीजेश आणि अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजित सिंग आणि संजय हे खेळाडू पॅरिसमध्येच थांबले आहेत. संघातील उर्वरित खेळाडू शनिवारी मायदेशी परतले तेव्हा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या खेळाडूंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीसाठी असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्यांनी भारतीय खेळाडू वाकले नाहीत, पण चाहत्यांच्या प्रेमापुढे ते नतमस्तक झाले. ढोल ताशांचा गजर आणि भांगडा वा ठेका यामुळे परिसरात एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चाहत्यांकडच्या पुष्पहारांची संख्या इतकी होती की, एक वेळ खेळाडूंचे चेहरेदेखील दिसत नव्हते. शेवटी खेळाडू हार घातला की लगेच काढून टाकत होते. या सगळ्या वातावरणाने खेळाडू भारावून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव असेच काहीसे सांगून जात होते.

India Captain: रोहित शर्मानंतर कोण होणार भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार? माजी भारतीय खेळाडूने सांगितली दोन नावं
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
Harbhajan Singh Statement on Rohit Sharma MS Dhoni
Harbhajan Singh: “धोनी खेळाडूंशी बोलत नाही, तर रोहित…” भारतीय कर्णधारांवर हरभजन सिंगचे वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूला पसंती
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Zaheer Khan has been appointed as the mentor
Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती
former pakistan cricketer basit ali advises jasprit bumrah to focus on bowling instead of captaincy
कर्णधारपदामागे धावू नकोस! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीचा बुमराला सल्ला
Sunil Gavaskar Statement on Virat Kohli And Rohit Sharma For Not Playing Duleep Trophy
Sunil Gavaskar: “जेव्हा तिशी पार केलेला खेळाडू…”, विराट-रोहितच्या दुलीप ट्रॉफी न खेळण्यावर सुनील गावसकर संतापले, BCCI ला पण सुनावलं

हेही वाचा…हुकलेली ‘सुवर्ण’संधी, की चितपट झालेले ‘डावपेच’?

‘‘आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळाला. चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. ऑलिम्पिक पदकाच्या अनुभवाबरोबर या प्रेमाने आमची झोळी भरभरून वाहत आहे. खूप आनंद झाला आहे. आम्हाला पदकविजेते झाल्याचा अभिमान वाटतो आणि दुसरीकडे जबाबदारी वाढल्याची भावनादेखील निर्माण झाली. या प्रेमामुळे जेव्हा जेव्हा मैदानात उतरू तेव्हा आम्ही पदक घेऊन परतू. हा विजय चाहत्यांसाठी इतका अवर्णनीय असेल, तर आमच्यासाठी किती ही कल्पना करा. संघातील प्रत्येक खेळाडूने ऑलिम्पिक तयारीसाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यामुळे संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करत आहे. अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे,’’ असे हरमनप्रीत म्हणाला.

हेही वाचा…Rahul Dravid : टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून सर्वात कठीण टप्पा कोणता होता? राहुल द्रविड यांनी सांगितले कटू सत्य

क्रीडामंत्र्यांकडून हॉकी संघाचा सत्कार

क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा शनिवारी सत्कार केला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने स्पेनला २-१ असे नमवित सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळवले. ‘‘संपूर्ण देशाला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे. या कामगिरीसह देशातील अनेक युवा खेळाडूंना तुम्ही प्रेरित केले आहे. हॉकी आपल्यासाठी खेळाहून अधिक आहे. संघाला कठोर मेहनत, खेळाप्रती असलेली वचनबद्धता यामुळे यश मिळाले आहे,’’ असे मांडवीय यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.