England vs Zimbabwe, Harry Brook Catch: इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ४ दिवसीय कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने आपलं वर्चस्व कायम राखत झिम्बाब्वेवर १ डाव आणि ४५ धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने हा सामना तिसऱ्याच दिवशी आपल्या नावावर केला. या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना अविश्वसनीय झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. इंग्लंडने आपला पहिला डाव ६ गडी बाद ५६५ धावांवर घोषित केला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सलामीला फलंदाजी करताना १२४ धावा केल्या. तर बेन डकेटने १४० धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ओली पोपने १७१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने ५६५ धावांचा डोंगर उभारला आणि डाव घोषित केला.

झिम्बाब्वेकडून पहिल्या डावात सलामीला फलंदाजी करताना ब्रायन बेनेटने १३९ धावांची खेळी केली. कर्णधार क्रेग एर्विनने ४२ धावांची खेळी केली. तर सीन विल्यम्सने २५ धावांची खेळी केली. झिम्बाब्वेचा पहिला डाव २६५ धावांवर आटोपला. इंग्लंडने झिम्बाब्वेला फॉलोऑन दिला.

हॅरी ब्रूकने घेतला भन्नाट कॅच

झिम्बाब्वेला दुसऱ्या डावात फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या डावात झिम्बाब्वेकडून सिन विल्यम्सने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. या डावात क्षेत्ररक्षण करत असताना हॅरी ब्रूकने वेस्ली माझेव्हेरेचा भन्नाट झेल घेतला. तर झाले असे की, इंग्लंडकडून ४८ वे षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्स गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑफ साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटची कडा घेत, स्लिपमध्ये असलेल्या हॅरी ब्रूकच्या हातात गेला. ब्रूकने उडी मारून उजव्या हाताने शानदार झेल घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यानंतर भारतीय संघासमोर भारतीय संघाचं आव्हान असणार आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये २० जूनपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.