संघासाठी खेळताना प्रत्येकवेळी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजही माझ्यात संघाला विजय मिळवून देण्याची कुवत असल्याचे ट्विट आयपीएल फिक्सिंगचा डाग असलेला भारताचा जलदगती गोलंदाज एस.श्रीशांतने केले आहे. त्याचबरोबर आजपर्यंत त्याच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या चाहत्यांचे आभारही त्याने ट्विटमधून व्यक्त केले. मी आशा सोडलेली नाही भविष्यात भारतासाठी खेळण्याची संधी मिळेल अशी आशा असल्याचेही श्रीशांत म्हणतो.