scorecardresearch

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गांगुलीचा कोहलीला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘त्याला कसोटी क्रिकेटमध्ये…’

Sourav Ganguly on Virat Kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीला विराट कोहलीकडून खूप अपेक्षा आहेत. कारण त्याच्या मते, भारतीय संघ त्याच्यावर अवलंबून असणार आहे.

Border Gavaskar Trophy Updates
विराट कोहली आणि सौरव गांगुली (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. ही मालिका जिंकूनच भारताला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठता येईल. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, विराट कोहलीला या मालिकेत धावा कराव्या लागतील. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ त्याच्यावर अवलंबून असेल.

विराट कोहलीची बॅट गेल्या काही वर्षांपासून शांत होती, पण २०२२मध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातून ब्रेक घेऊन कोहली क्रिकेटच्या मैदानात परतला तेव्हापासून त्याचे दुसरे रुप पाहिला मिळत आहे. कोहली अतिशय आक्रमक फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर त्याने बऱ्याच दिवसांचा शतकांचा दुष्काळदेखील संपवला आहे.

सौरव गांगुली स्पोर्ट्स तकला म्हणाला, ”हो, नक्कीच. श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध त्याने खरोखरच चांगली फलंदाजी केली आहे. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सुधारणा करावी लागेल. कारण भारत त्याच्यावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक अतिशय महत्त्वाची मालिका येत आहे. जी मला वाटते की या दोघांमधील मालिका खूप स्पर्धात्मक असेल. दोन्ही संघ खूप चांगले आहेत. हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा – अक्षरचे क्रिकेट ठुमके तुम्ही पाहिलेत का? स्वतः च्या लग्नातील डान्सचा मजेशीर VIDEO व्हायरल

ब्रेकवरुन परतल्यानंतर कोहलीने आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतक पूर्ण करून शतकाचा दुष्काळ संपवला. तसेच वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय क्रिकेटमध्येही शतक झळकावले. २०२३ ची सुरुवात कोहलीसाठी आणखीनच शानदार होती. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याच्या बॅटमधून आणखी दोन शतके झळकली. पण आता कसोटी क्रिकेटची पाळी आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कोहली खूप चांगला दिसत आहे, पण आता त्याला क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये फॉर्म गवसण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:02 IST