scorecardresearch

अंतिम निकालाबाबत निराशा, पण स्पर्धेतील प्रवासाबाबत समाधानी! मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रतिक्रिया

या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार म्हणून रोहित शर्माने केलेल्या कामगिरीचे द्रविडने कौतुक केले

head coach rahul dravid reaction
भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Twitter/BCCI)

अहमदाबाद : आमच्यासाठी जेतेपद मिळवण्याची ही उत्तम संधी होती. मात्र, अंतिम लढतीत आम्हाला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. आम्ही सर्वच खूप निराश आहोत. ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला आणि ते जिंकले. परंतु संपूर्ण विश्वचषकात आमच्या संघाने ज्याप्रकारे खेळ केला, त्याबाबत मी खूप समाधान आहे, अशी प्रतिक्रिया विश्वचषकाच्या अंतिम लढतीतील पराभवानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली.

हेही वाचा >>> Australia Won World Cup 2023 Final: भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविड प्रशिक्षकपद सोडणार? पत्रकार परिषदेत दिले ‘हे’ संकेत!

Asian games 2023: Indian archers target gold in Asian Games Brilliant performance by Jyoti Aditi and Praneet
Asian games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद! ज्योती, अदिती आणि प्रनीतची शानदार कामगिरी
Ram Baboo Asian Games medalist
शेतमजूर ते आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेता, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला ‘या’ व्यक्तीचा VIDEO तुम्हालाही देईल प्रेरणा
Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?
Samit Dravid: Amazing work of Rahul Dravid's son Samit included in Karnataka team for Vinoo Mankad Trophy
Rahul Dravid’s son: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्युनिअर द्रविडची शानदार कामगिरी, अंडर-१९ संघात झाली निवड

तसेच अंतिम लढतीत भारतीय संघाला ३०-४० धावा कमी पडल्या. या धावांनी खूप फरक पडला असता असे द्रविडला वाटते. ‘‘आम्ही २४० ऐवजी २८० किंवा २९० धावा केल्या असत्या, तर त्या गाठणे ऑस्ट्रेलियाला सोपे गेले नसते. ऑस्ट्रेलियाची १० षटकांत ३ बाद ६० अशी स्थिती होती. त्यानंतर अतिरिक्त ३०-४० धावा करताना त्यांना कदाचित दडपण आले असते,’’ असे द्रविड म्हणाला.

या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार म्हणून रोहित शर्माने केलेल्या कामगिरीचे द्रविडने कौतुक केले. ‘‘रोहितचे नेतृत्व उत्कृष्ट होते. ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंचा त्याला कायम पाठिंबा राहिला आहे. त्याने हा संघ तयार करण्यासाठी आपला वेळ आणि उर्जा खर्ची केली आहे. फलंदाज म्हणूनही त्याने त्याचे वेगळेपण दाखवून दिले. त्याने आम्हाला नेहमी पाया रचून दिला. त्याने स्वत:च्या कामगिरीने अन्य खेळाडूंसमोर आदर्श ठेवला,’’ असेही द्रविडने नमूद केले. तसेच आता प्रशिक्षक म्हणून करार संपुष्टात आला असला, तरी भविष्याबाबत अद्याप आपण विचार केला नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Head coach rahul dravid reaction after india lost world cup final match against australia zws

First published on: 20-11-2023 at 04:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×