Premium

SA vs AUS: हेनरिक क्लासेनच्या वादळी शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, ठरला जगातील पहिलाच संघ

South Africa Break India’s Record: दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५० षटकांत ५ बाद ४१६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने शानदार शतक झळकावले. हेनरिक क्लासेनने ८३ चेंडूत १७४ धावा केल्या.

South Africa Break India's Record
हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरची वादळी खेळी (फोटो-आयसीसी ट्विटर)

SA create history by scoring 400 plus runs for the seventh time in ODIs: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ वनडे मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५० षटकात ५ विकेट गमावत ४१६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने शानदार शतक झळकावले. हेनरिक क्लासेनने ८३ चेंडूत १७४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि १३ षटकार मारले. यासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेने मोडला भाराताचा विक्रम –

वास्तविक, दक्षिण आफ्रिकेने वनडे फॉरमॅटमध्ये सातव्यांदा ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा उच्चांक आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा सहा वेळा ४०० हून अधिक धावा करणयाचा विक्रम मोडला. आता दक्षिण आफ्रिकेशिवाय इतर कोणत्याही संघाला वनडे इतिहासात सात वेळा ४०० धावांचा आकडा गाठता आलेला नाही. मात्र, दक्षिण आफ्रिका संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांची वादळी खेळी –

प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रेझा हेन्रिक्स यांनी पहिल्या विकेटसाठी १२.५ षटकांत ६४ धावा जोडल्या. क्विंटन डी कॉकने ६४ चेंडूत ४५ धावा केल्या. तसेच रेझा हेन्रिक्सने ३४ चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. व्हॅन डर डुसेनने ६५ चेंडूत ६२ धावा केल्या. पण यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्यात पाचव्या विकेटसाठी २२२ धावांची विक्रमी भागीदारी झाली. शेवटच्या चेंडूवर हेन्रिक क्लासेन बाद झाला. मात्र, डेव्हिड मिलर ४५ चेंडूत ८२ धावा करून नाबाद परतला.

अॅडम झाम्पाच्या नावावर नोंदवला गेला लाजिरवाणा विक्रम –

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याच्या बाबतीत झाम्पा संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत झाम्पासोबतच पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिक लुईस आहे, ज्याने २००६ मध्ये जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० षटकात ११३ धावा दिल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Henrik klaasens century helped sa create history by scoring 400 plus runs for the seventh time in odis against aus vbm

First published on: 15-09-2023 at 23:34 IST
Next Story
IND vs BAN, Asia Cup: शुबमन गिलचे शतक व्यर्थ! बांगलादेशने अकरा वर्षानंतर रचला इतिहास, भारताचा सहा धावांनी पराभव