ICC Men’s T20I Team Of The Year : पाकिस्तानच्या बाबर आझमकडं नेतृत्व; संघात एकही भारतीय नाही!

ICCनं या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंना स्थान दिलं आहे.

Here is the ICC Mens T20I team of the year
आयसीसीनं जाहीर केला वर्षातील सर्वोत्तम टी-२० आंतरराष्ट्रीय संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम टी-२० पुरुष आंतरराष्ट्रीय संघ (ICC Men’s T20I Team of the Year) जाहीर केला. या संघात कोणत्याही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. या संघात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदीसह तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. बाबर आझमला या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आशिया खंडातून, श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि मुस्तफिझूर रहमान हे अन्य दोन खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले आहेत. मात्र यामध्ये एकाही भारतीयाचा सहभाग नाही.

मागील वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारत अपयशी ठरला. बाबरला कर्णधार म्हणून निवडण्याच्या निर्णयाबाबत आयसीसीने सांगितले, “पाकिस्तानचा कर्णधार बाबर २०२१ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये दर्जेदार खेळाडू ठरला, त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. २०२१ मध्ये, बाबरने २९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आणि ९३९ धावा केल्या, त्यात एक शतक आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.”

हेही वाचा – तुफान आलंया..! IPLपूर्वी विराटच्या मित्राचं तांडव; २२ चौकारांसह ठोकले ‘इतके’ षटकार!

आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय संघ: जोस बटलर, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आजम (कप्तान), एडन मार्कराम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, तबरेज शम्सी, जोस हेजलवूड, वानिंदू हसरंगा, मुस्तफिजुर रहमान, शाहीन आफ्रिदी.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Here is the icc mens t20i team of the year adn

Next Story
तुफान आलंया..! IPLपूर्वी विराटच्या मित्राचं तांडव; २२ चौकारांसह ठोकले ‘इतके’ षटकार!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी