Yograj Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू, अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील हे वादग्रस्त विधानांमुळं नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कपिल देव, युवराज सिंगचे करिअर, हिंदी भाषा आणि महिलांबद्दलची त्यांची मते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडली आहेत. हिंदी भाषेबद्दल बोलताना योगराज सिंग म्हणाले की, ही बायकी भाषा वाटते. पण महिलांच्या तोंडून ऐकताना ती चांगली वाटते. पण पुरुष हिंदी बोलताना बायकी वाटतात. पुरुषांची भाषा पंजाबी आहे. या भाषेत दरारा आहे.

नेमकं काय म्हणाले योगराज सिंग?

युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांनी त्याच्या हिंदी भाषेवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “मला तर हिंदी भाषा ऐकताना असं वाटतं एखादी बाई बोलत आहे. जेव्हा बाई हिंदी बोलत असेल तेव्हा चांगलं वाटतं. पण जेव्हा पुरुष हिंदी बोलायला लागतो, तेव्हा वाटतं हा काय बोलतोय. हा काय पुरुष आहे का? मला तर तो वेगळा वाटतो.”

Mahesh Babu
“तू, मी अन्…”, महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरसाठी खास पोस्ट; सोनाली बेंद्रे व ट्विंकल खन्नाने केल्या कमेंट्स
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ranveer allahbadia on indias got latent video
स्पर्धकाच्या आई-वडिलांच्या प्रायव्हसीवर अश्लील वक्तव्य; रणवीर अलाहाबादियावर लोकांचा संताप, म्हणाले, “विकृत…”
Khushi Kapoor
खुशी कपूरने कधी रिक्षाने प्रवास केलाय का? उत्तर देत म्हणाली, “आई-बाबांचा विरोध…”
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

हे वाचा >> Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान

महिलांना अधिकार देऊ नका – योगराज सिंग

फक्त भाषेबद्दलच नाही तर त्यांनी महिलांबद्दलही वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले, “जर महिलेला कुटुंबप्रमुख केलं तर त्या सर्व बिघडवून ठेवतील. “पत्नीला जर अधिकार दिले, तर ती तुमचे घर उध्वस्त करून ठेवेल. मला माफ करा, पण इंदिरा गांधींनी हा देश चालविला आणि उध्वस्त करून ठेवला. महिलांना प्रेम आणि आदर द्या, पण त्यांना अधिकार देऊ नका.”

योगराज सिंग यांच्या विधानांचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यांच्या मतांशी असहमती दर्शविली आहे. याआधी कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या विरोधात योगराज सिंग अनेकदा बरळले आहेत. पण यावेळी त्यांनी थेट महिलांना लक्ष्य केल्यानतंर त्यांचा निषेध करण्यात येत आहे.

योगराज सिंग यांना एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे, असे काही युजरनी म्हटले आहे. तर महिलांनी त्यांचा विरोध करताना म्हटले की, योगराज सिंग महिलांबद्दल बोलत असताना त्यांनी त्यांच्या आईचाही अवमान केला आहे. काहींनी महिला आयोगाला टॅग करत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एवढेच नाही तर योगराज सिंग यांनी युवराज सिंगबद्दल बोलताना म्हटले की, “२०११ साली युवराज सिंग कर्करोगाने मरण पावला असता आणि त्याच्यामुळे भारताला विश्वचषक मिळाला असता तर बाप म्हणून मला अभिमानच वाटला असता. मला आजही त्याचा अभिमान वाटतो. हे मी त्याला फोनवरही सांगितले होते. तो रक्ताच्या उलट्या करत असतानाही त्याने खेळावे, अशी माझी इच्छा होती. मी त्याला तेव्हा म्हणालो, तू घाबरू नको, तू मरणार नाहीस. भारतासाठी हा विश्वचषक जिंकून आण”.

Story img Loader