VIDEO : सेक्स लाइफविषयी प्रश्न विचारताच नीरज चोप्रा म्हणाला…

हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.

historian rajeev sethi asks neeraj chopra about his sex life in
नीरज चोप्रा

टोक्यो २०२० ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतात परतल्यानंतर अनेक मीडिया चॅनेल्सला मुलाखती देत आहे. त्याच्यावर सतत प्रश्नांचा भडिमार होत आहे. वैयक्तिक आयुष्यावरही अनेक जण नीरजला प्रश्न विचारत आहेत. अलीकडे, एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या नीरजच्या मुलाखतीची क्लिप व्हायरल झाली. त्या व्हिडिओमध्ये नीरज खूप अस्वस्थ दिसत होता. आता त्याची आणखी एक मुलाखत चर्चेत आली आहे.

नीरजला त्याच्या सेक्स लाइफबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. राजीव सेठी यांनी हा प्रश्न विचारला. सेठी म्हणाले, ”हे देशातील करोडो लोकांना विचारायचे असेल, तर मीही विचारतो … तुम्ही तुमचे प्रशिक्षण आणि तुमचे सेक्स लाइफ याचे संतुलन कसे राखता? मला माहीत आहे, की हा एक मूर्ख प्रश्न आहे पण त्यामागे एक गंभीर प्रश्न आहे.”

हेही वाचा – ENG vs IND : कारकिर्दीच्या पुस्तकात ‘हिटमॅन’नं लिहिलं नवं पान; ओव्हल टेस्टमध्ये रचले रेकॉर्डवर रेकॉर्ड!

सेठी यांचा प्रश्न ऐकून नीरज खूप अस्वस्थ झाला. त्याने ”सॉरी सर, सॉरी सर …”, असे उत्तर दिले. यानंतरही सेठी यांनी परत तोच प्रश्न विचारला. यावर मुलाखत नियंत्रकाने ”नीरजला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही”, असे सांगितले. सेठी म्हणाले, ”मला माहीत होते.” यावर नीरजने ”प्लीज सर! तुमच्या प्रश्नाने माझे मन भरले.” असे उत्तर दिले.

 

नीरजला विचारलेल्या प्रश्नाबद्दल सोशल मीडियावर सेठी यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Historian rajeev sethi asks neeraj chopra about his sex life in adn

ताज्या बातम्या