Team India Record In IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी कर्णधार शुबमन गिलने भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल केले आहेत. या सामन्यासाठी गिलने प्लेइंग ११ मध्ये ६ डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. यासह ४ फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत कर्णधार शुबमन गिलने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या प्लेइंग ११ मध्ये ११ पैकी ६ खेळाडू डावखुरे आहेत. ज्यात वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. हे भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं आहे. याआधी भारतीय संघ कधीच ६ डावखुऱ्या खेळाडूंसह मैदानात उतरलेला नाही. गिलने घेतलेला हा निर्णय योग्य ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

यासह भारतीय संघाने आपल्या प्लेइंग ११ मध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये ४ फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं आहे. ज्यात ३ डावखुऱ्या गोलंदाजांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं तिसऱ्यांदाच असं घडलं आहे की, भारताच्या प्लेइंग ११ मध्ये ३ डावखुऱ्या गोलंदाजांना खेळण्याची संधी दिली गेली आहे.

ज्यात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलचा समावेश आहे. भारतीय क्रिकेटमध्ये असं चौथ्यांदा घडलं आहे. या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातून साई सुदर्शनला वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुदंरचा समावेश करण्यात करण्यात आला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज