India vs Newzealand 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना वडोदराच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने ५० षटकांअखे ३०० धावा केल्या. दरम्यान डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या हेनरी निकोल्स आणि डेवॉन कॉनव्हे या जोडीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. डावाची सुरुवात करताना हेनरी निकोल्स आणि डेवॉन कॉनव्हे या जोडीने ताबडतोड सुरुवात केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. डेवॉन कॉनव्हेने ५६ धावा केल्या. तर हेनरी निकोल्सने ६२ धावा केल्या. यासह या जोडीच्या नावे मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा असं घडलं आहे की, न्यूझीलंडच्या सलामी जोडीने भारतात वनडे सामना खेळताना १०० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. या जोडीने २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच शतकी केली आहे. याआधी १९९९ मध्ये नॅथन एस्टल आणि क्रेस स्पीयरमन या जोडीने डावाची सुरूवात करताना शतकी भागीदारी केली होती. त्याआधी १९८८ मध्ये फलंदाजी करताना जॉन राईट आणि अँड्र्यू जोन्स या जोडीने शतकी भागीदारी केली होती.
न्यूझीलंडने केल्या ३०० धावा
या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडकडून हेनरी निकोल्सने ६२ आणि डेवॉन कॉनव्हेने ५६ धावांची खेळी केली. डॅरील मिशेलने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ५० षटकांअखेर ८ गडी बाद ३०० धावा केल्या.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने १ गडी बाद केला. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाला रिकाम्या हाती परतावं लागलं
