रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या  ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पध्रेत भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने अप्रतिम कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. हा पराक्रम करणारी दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात तिने नववे स्थान पटकावले. तिने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई केली. ‘५२.६९८ गुणांची कमाई केल्यानंतर दीपाला ऑलिम्पिक पात्रता मिळेल याची खात्री होती. अजून तीन सबडिव्हीजन बाकी होते, परंतु तिने तीन देशांच्या जिम्नॅस्टिना आधीच पराभूत केले होते. त्यामुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी वृत्तसंस्थेला दिली. ते पुढे म्हणाले, ‘ या स्पर्धेत ३३ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि तिला तीन देशांच्या खेळाडूंपेक्षा अधिक गुणांची कमाई करायची होती. त्यात ती यशस्वी ठरली.’’
याआधी, गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या जागतिक जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेमध्ये पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे दीपाला ऑलिंपिकचे तिकिट मिळविण्यात अपयश आले होते. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दीपा करमरकरचा समावेश राखीव खेळाडुंच्या यादीत करण्यात आला होता. मात्र पात्रता फेरीतील संधीचे मात्र तिने सोने केले. दीपाने याआधीच ग्लासगो येथे २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये जिम्नॅस्ट प्रकारांत कांस्यपदक मिळवित इतिहास घडविला आहे. याचबरोबर गेल्या नोंव्हेबर महिन्यातील जागतिक जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारीही ती पहिलीच भारतीय महिला ठरली होती.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Ranji Trophy 2024 Semi Final Updates in Marathi
Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यर मुंबईकडून उपांत्य फेरी खेळण्यासाठी उपलब्ध, एमसीएने दिली माहिती