बांगलादेशात पार पडलेल्या आशिया चषकात विजय मिळवल्यानंतर हॉ़की इंडियाने आगामी स्पर्धांसाठी आतापासून कंबर कसायला सुरुवात केली आहे. भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने ३५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. हे सर्व खेळाडू ‘साई’च्या बंगळुरु येथील सराव शिबीरात आपला सहभाग नोंदवणार आहेत. १ डिसेंबरपासून वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

आशिया चषक विजेत्या संघातील खेळाडू आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या युवा संघातील खेळाडूंची या शिबीरात निवड करण्यात आलेली आहे. भारतीय संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे, अनुभवी गोलकिपर पी. आर. श्रीजेशचंही या शिबीरात पुनरागमन झालंय. याव्यतिरीक्त ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह, फुलबॅक बिरेंद्र लाक्रा, कोठाजीत सिंह यांनाही या शिबीरात जागा मिळाली आहे.

असा असेल सराव शिबीरासाठी निवड झालेला भारतीय संघ –

गोलकिपर – आकाश चिकटे, पी. आर. श्रीजेश, विकास दहीया, सुरज करकेरा

बचावपटू – दिप्सन तिर्की, प्रदीप मोर, बिरेंद्र लाक्रा, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, रुपिंदरपाल सिंह, हरमनप्रीत सिंह, जसजीत सिंह कुल्लर, गुरिंदर सिंह, अमित रोहीदास, वरुण कुमार

मधली फळी – चिंगलेनसाना सिंह, एस. के. उथप्पा, सुमीत, सतबीर सिंह, सरदार सिंह, मनप्रीत सिंह, हरजीत सिंह, निलकांत शर्मा, मनप्रीत (ज्युनिअर), सिमरनजीत सिंह

आघाडीची फळी – रमणदीप सिंह, एस. व्ही. सुनील, तलविंदर सिंह, मनदीप सिंह, अफ्फान युसूफ, निकीन थिमय्या, गुरजंत सिंह, आकाशदीप सिंह, ललित उपाध्याय, अरमान कुरेशी