Hockey World Cup 2023 Final: हॉकी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात जर्मनीने पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमचा ५-४ असा पराभव केला. भुवनेश्वरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात चमकदार कामगिरी करत जर्मनीने तिसरे विश्वचषक जिंकले. हा सामना अतिशय रोमांचक होता, पूर्णवेळपर्यंत दोन्ही संघांनी ३-३ अशी बरोबरी साधली होती. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीचा ५-४ असा विजय झाला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जर्मनीनं अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला मात दिली. दुसरीकडे भारतीय संघ क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत होऊन स्पर्धबाहेर झाला होता. पण वर्गीकरण सामन्यात भारताने चांगली कामगिरी करत ९व्या स्थानावर स्पर्धा संपवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भुवनेश्वरमध्ये खेळल्या गेलेल्या आजच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत जर्मनीनं तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. फायनलचा सामना अतिशय रोमांचक झाला, फुल टाईमपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ गोल करत सामन्यात बरोबरी साधली होती. त्यानंतर विजेता कोण? हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. बेल्जियम चे ११ खेळाडू ३० वर्षाहून अधिक वयाचे आहेत तर ३ खेळाडू ३५ वर्षापेक्षा मोठे आहेत. चार वर्षापूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच टोकियो ऑलिंपिक च्या सुवर्णपदक विजेत्या संघात हे खेळाडू सहभागी होते. त्यामुळे बेल्जियमचा संघ अनुभवी तसेच प्रभावशाली मानला जात होता मात्र त्यांच्यावर मात करत जर्मनी ने विजेतेपद पटकावले.

जर्मनीचे तिसरे विश्वविजेतेपद

जर्मनीचे हे तिसरे विश्वविजेतेपद आहे. यापूर्वी या संघाने २००२ आणि २००६ मध्ये विश्वचषक जिंकला होता. अंतिम फेरीत बेल्जियमच्या फ्लोरेंट ऑबेलने १०व्या मिनिटाला पहिला गोल करून स्पर्धेला सुरुवात केली. तर टॅंग्यु कोसिन्सने काही सेकंदात बेल्जियमची आघाडी दुप्पट केली. पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवातीचे दोन गोल स्वीकारल्यानंतर जर्मनीने शानदार पुनरागमन केले. बेल्जियमने तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत जर्मन डी-सर्कलमध्ये प्रवेश केला, परंतु जर्मन बचावपटूने चेंडूवर ताबा घेत गोल वाचवला.

हेही वाचा: Women U19 WC: विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार! भारताच्या लेकींच्या गौरवाचा नरेंद्र मोदी स्टेडियम होणार साक्षीदार

जर्मनी परतल्यानंतर स्कोअर बरोबरीत

हाफ टाईमच्या हूटरपूर्वी जर्मनीच्या निकलास वेलेनने शानदार गोल करत आघाडी कमी केली. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोन्झालो पेइलाटने पेनल्टी कॉर्नरचे यशस्वीपणे गोल करून जर्मनीला बरोबरी साधून दिली. अंतिम क्वार्टरमध्ये जर्मनीने स्पर्धेत प्रथमच आघाडी घेतली. कर्णधार मॅट ग्रॅम्बुशने डावीकडून बेल्जियमच्या गोलकीपरला षटकार ठोकला. मात्र, बेल्जियमचा खेळाडू टॉम बूनच्या गोलने गुणसंख्या बरोबरीत आणली. यानंतर पेनल्टी शूटआऊट झाला, ज्यामध्ये जर्मनीने ५ गोल केले, तर बेल्जियम संघ केवळ ४ गोल करू शकला. वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नवव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने त्याला जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. मात्र, यानंतर टीम इंडियाने जपान आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत नववे स्थान मिळविले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey wc 2023 winner germany beat belgium in thrilling match the name engraved on the world cup for the third time avw
First published on: 29-01-2023 at 21:58 IST