Hong Kong Super Sixes Rules And Format: हाँगकाँगमध्ये ‘हाँगकाँग सुपर सिक्सेस’ ही स्पर्धा खेळवली जाते. छोटं मैदान, ११ ऐवजी ६ खेळाडू आणि चौकार- षटकारांचा पाऊस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग नसलेले काही खेळाडू आणि निवृत्ती जाहीर केलेले काही माजी खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतात. आगामी हाँगकाँग सुपर सिक्सेस २०२६ स्पर्धेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आह. ही स्पर्धा सुरू होण्याआधी या स्पर्धचा फॉरमॅट समजून घ्या.

या स्पर्धेचा फॉरमॅट कसा असतो आणि नियम काय आहेत?

एका संघात किती खेळाडू असतात?
क्रिकेटमध्ये सहसा एका संघाकडून ११ खेळाडू खेळतात. पण या स्पर्धेत एका संघात यष्टीरक्षकासह ६ खेळाडूंचा समावेश असतो.

किती षटकांचा खेळ होतो?
या स्पर्धेत प्रत्येकी ५-५ षटकांचे सामने खेळवले जातात. प्रत्येक षटकात ६ चेंडू टाकले जातात. पण फायनलमध्ये प्रत्येक षटकात ६ ऐवजी ८ चेंडू टाकले जातात.

किती गोलंदाज गोलंदाजी करतात?
सामना ५ षटकांचा असला तरीदेखील यष्टीरक्षक वगळता इतर पाचही खेळाडूंनी गोलंदाजी करणं अनिवार्य असतं.

फलंदाजीतील अनोखा नियम
एखादा फलंदाज जर ५० धावांवर पोहोचला, तर तो रिटायर्ड होतो. त्यानंतर तो पुन्हा एकदा फलंदाजीसाठी येऊ शकतो.

वाईड आणि नो चेंडूचा नियम
जर गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाजाने वाईड किंवा नो चेंडू टाकला, तर फलंदाजी करत असलेल्या संघाला १ ऐवजी २ धावा मिळतात.

शेवटचा फलंदाज फलंदाजी करू शकतो
या स्पर्धेतील आणखी एक आगळावेगळा नियम म्हणजे, जर सर्व फलंदाज बाद झाले आणि एकमेव फलंदाज शिल्लक राहिला असेल, तर तो रनर घेऊन एकटा फलंदाजी करू शकतो.

या स्पर्धेचा फॉरमॅट कसा असतो?
या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभाग घेतात या १२ संघांना ४ गटात विभागलं जातं.

सामना किती वेळ सुरू राहतो?
हा क्रिकेटचा झटपट फॉरमॅट आहे. एक सामना हा केवळ ४५ मिनिटात समाप्त होतो.

असे आहेत ४ गट

अ गट- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हाँगकाँग चीन
ब गट- श्रीलंका, बांगलादेश, स्कॉटलँड
क गट- टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई
ड गट- दक्षिण आफ्रिका, ओमान, अफगाणिस्तान

हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धेतील सामना बरोबरीत समाप्त झाला, तर निकाल कसा लावला जातो?
स्पर्धेतील अधिकृत नियमानुसार सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर निकाल आणि गुणतालिकेतील स्थान निश्चित करण्यासाठी एकूण रनरेटचा वापर केला जात होता.

आगामी हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धा केव्हा होणार?
आगामी हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धेचा थरार ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे.