विराट कोहली भारतीय संघातील ‘ऑल टाईम फिट’ खेळाडू परंतु, या युवा खेळाडूने जेव्हा तो सचिनच्या वयाचा होईल तेव्हा, मी देखील त्याच्यासारखाच फिट राहुदे हीच माझी इच्छा असल्याचे म्हटले आहे. विराट सचिनला ‘फिटनेस’साठी आपला गुरू मानतो.
विराट म्हणाला, “मी ही भारतासाठी सचिन इतकाच काळ खेळू शकेन अशी माझी इच्छा आहे. सचिनची ‘फिटनेस’ वाखाडण्याजोगी आहे. जर मी, सचिनने गाठलेल्या यशापैकी ६०-७० टक्के तरी मी गाठू शकलो तरी माझ्यासाठी मोठी गोष्ट ठरेल” असेही विराट म्हणाला.