U19 World Cup Semifinal Scenario: अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे सुपर-६चे सामने खेळवले जात आहेत. इंग्लंडने शुक्रवारी (३० जानेवारी) बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत २०२६ अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या निकालामुळे सुपर सिक्स गट ‘ब’मधून भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी केवळ एकच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असून, त्यामुळे या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील सामना अधिकच अटीतटीचा होणार आहे.
थॉमस र्यू यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे. उपांत्य फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा अफगाणिस्तान यांच्यापैकी एका संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे ३ संघ अंडर-१९ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. भारत–पाकिस्तान सामन्यानंतर, रविवारी (१ फेब्रुवारी) गटातील अंतिम क्रमवारी निश्चित होईल.
इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान – उपांत्य फेरीची समीकरणं
भारत
भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यास उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल आणि इंग्लंडपेक्षा चांगल्या नेट रन रेटमुळे गटात अव्वल स्थान पटकावेल. यामुळे उपांत्य फेरीत भारताचा अफगाणिस्तानशी सामना होईल. भारत पाकिस्तानविरूद्ध पराभूत झाला तरी तो ८५ धावांपेक्षा कमी फरकाने पराभूत होणं गरजेचं आहे. पाकिस्तान धावांचा पाठलाग करत असल्यास, ३१.५ षटकांपूर्वी संघाने लक्ष्य गाठणार नाही (लक्ष्य २५० असल्यास ३३.२ षटकांपूर्वी विजय नाही) याची भारताला खात्री करावी लागेल.
पाकिस्तान
पाकिस्तानसाठी फक्त विजय पुरेसा नाही. त्यांना भारताचा नेट रन रेट मागे टाकावा लागेल (भारताच्या मुद्द्यात वर स्पष्ट केल्याप्रमाणे). पाकिस्तान आता गटात अव्वल स्थान मिळवू शकत नाही. पात्र ठरल्यास, उपांत्य फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
इंग्लंड
इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत खेळणार आहे. भारत पाकिस्तानकडून पराभूत झाल्यास इंग्लंडची अफगाणिस्तानशी लढत होईल. मात्र भारत गटात अव्वल ठरल्यास, इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर घसरेल. अशा परिस्थितीत १९९८ चा विजेता इंग्लंड ऑस्ट्रेलियाशी उपांत्य फेरीत भिडेल.
आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ – तारखा, ठिकाणं, सामने
पहिला सेमीफायनल सामना-१ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड/भारत – बुलावायो मंगळवारी (३ फेब्रुवारी)
दुसरा सेमीफायनल सामना २ – अफगाणिस्तान विरुद्ध भारत/पाकिस्तान/इंग्लंड – हरारे बुधवारी (५ फेब्रुवारी).

