Chess Olympiad 2024 How Divya Deshmukh Wins: ४५ वे चेस ऑलिम्पियाड १० ते २३ सप्टेंबरदरम्यान बुडापेस्ट येथे खेळवले जात आहेत. या स्पर्धेत भारताचे काही खेळाडू सहभागी झाले आहेत. चेस ऑलिम्पियाडमध्ये सुरू असलेल्या गेम्समध्ये भारताच्या दिव्या देशमुखने अखेरच्या १७ सेकंदात बाजी मारत विजय मिळवला. पाहूया नेमकं काय घडलं?

दिव्या देशमुख चेस ऑलिम्पियाडच्या चौथ्या फेरीत पूर्णपणे पराभूत झालेल्या स्थितीत होती. तिचा सामना महिला ग्रँडमास्टर मित्रा हेजाझीपूर हिच्याविरूद्ध सुरू होता. घड्याळात फक्त १७ सेकंद शिल्लक असताना, तिच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तीन प्यादे कमी होते. तिला फक्त एक चाल चालायची होती.अव्वल सीडेड भारतीय महिला संघाचा सामना फ्रान्सविरूद्ध सुरू होता. वैशालीचा खेळ अनिर्णित राहिला, परंतु हरिका द्रोणावल्ली आणि तानिया सचदेव अजूनही दोन्ही बाजूंनी गेममध्ये कायम होत्या.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

चेस ऑलिम्पियाडमधील महत्त्वाची बाब म्हणजे वैयक्तिक विजय किंवा पराभव संघातील खेळाडूंच्या उर्वरित निकालांद्वारे सहजपणे भरून काढला जाऊ शकतो, त्यामुळे खेळाडूंना इतर सामन्यांवर पण लक्ष ठेवावे लागते, जेणेकरून आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरूद्ध कशी चाल खेळायची की गेम ड्रॉ करायचा याचा निर्णय घेता येईल. शनिवारी वंतिका अग्रवालच्या जागी तानिया सचदेवला चौथ्या बोर्डावर खेळण्यास सांगितले. त्या टप्प्यावर गुंतागुंतीच्या स्थितीत सापडली होती, पण ती लढत राहिली.

“हरिकाच्या बोर्डवर काय चाललं आहे ते मला दिसत नव्हतं कारण ती खूप दूर होती आणि वैशालीचा गेम ड्रॉ झाला होता हे मला माहित होते. पण मला दिव्या देशमुखचा बोर्ड दिसला आणि मी चकित झाले! त्यामुळे माझा बोर्ड गुंतागुंतीच्या स्थितीत होता तरी मी खेळण्याचा निर्णय घेतला,” चेसबेस इंडियासह बोलताना तानिया म्हणाली.

हेही वाचा – माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

वेळेच्या दबावाखाली असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी?

दिव्या देशमुखच्या बोर्डवर जणू बॉलीवूड थ्रिलरसारखा तणाव जाणवत होता. एखादा बॉलिवूड चित्रपटाचा सीन सुरू असल्यासारखे चित्र तिथे होते. दिव्या देशमुखला तिच्या नाईटला डी२ स्क्वेअरवर आणण्यासाठी चाल खेळायची होती. ही एक अशी चाल होती ज्यामुळे तिच्या प्रतिस्पर्ध्याच्या बोर्डवरील राणीवर b3 स्क्वेअरवर दबाव आणला आणि एका चालीनंतर, हेजाझीपूरच्या नाइट f6 स्क्वेअरवर राजाच्या समोर सेन्ट्री म्हणून उभ्या असलेल्या प्याद्यावर ती अटॅक करू शकत होती. अक्षरश अटीतटीचा क्षण होता. तिच्या पलीकडे बोर्डवर हेजाझीपूर होती आणि घड्याळाची अदृश्य टिकटिक सुरू होती.

दिव्या देशमुख भारताची बुद्धिबळपटू

तितक्यात दिव्या देशमुखने एक चकित करणारी चाल खेळली. दिव्याने तिच्या राणीचा वापर करत डाव तिच्या नियंत्रणात आणला आणि त्यानंतर पुढच्या १६ चालींमध्ये तिने सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला संघाला फ्रान्सवर ३.५-०.५ असा विजय मिळवून दिला.

मागील फेऱ्यांमध्ये, दिव्या देशमुख तिचा सामना संपवणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक होती, ज्यामुळे तिच्या बाकीच्या सहकाऱ्यांना त्यांच्या स्पर्धा खेळताना चालना मिळाली. पण, शनिवारी ती सामना संपवणारी शेवटची खेळाडू होती आणि यासह तिने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.