भारताच्या मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल या युवा नेमबाजांना टोक्यो ऑलिम्पिकमध्ये निराशानजक निकालाला सामोरे जावे लागले. महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत मनूला बाराव्या तर यशस्विनीला तेराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार म्हणून मनूकडे पाहिले जात होते. पण आता तिचे पदकांचे स्वप्न भंगले आहे.

मनूने पात्रता फेरीत ५७५ गुण मिळवले. यावेळी तिच्या बंदुकीत म्हणजे पिस्तुलामध्ये बिघाड निर्माण झाला होता, ज्यामुळे तिला काही काळ आपला खेळ थांबवावा लागला. पिस्तुलाच्या लेवरमध्ये बिघाड झाला होता. या बिघाडावेळी मनूला ५५ मिनिटांच ४४ शॉट्स खेळायचे होते. जेव्हा ती परतली तेव्हा तिला राहिलेले शॉट्स ३६ मिनिटांत खेळावे लागणार होते. शूटिंग रेंजला परतल्यानंतर मनूचे पिस्तुल तपासण्यात अजून ४-५ मिनिटे वेळ गेला.

मनुचे प्रशिक्षक रौनक पंडित या घटनेबद्दल म्हणाले, ”सहसा १० मीटर एअर पिस्तुलामध्ये बिघाड होत नाही. २५ मीटर प्रकारात पिस्तुलामध्ये बिघाड होणे ही सामान्य गोष्ट आहे. लेवर हा पिस्तुलाचा आतला भाग आहे. त्यामुळे हे कसे घडले हे नक्की सांगता येणे कठीण आहे. असे होण्याची शक्यता ०.१ टक्के असते. मी १९९९पासून वापरत असलेली पिस्तुल अद्यापही चांगल्या स्थितीत आहे. पण मनुच्या बंदुकीचा लेवर चार वर्षातच तुटला.”

चीनची नेमबाज जियान रानसिंग अव्वल

मनू भाकेर शिवाय भारताची दुसरी नेमबाज यशस्विनी देसवाल हिला देखील अंतिम सामन्यात प्रवेश करताला आला नाही. ती ५७४ गुणासंह १४व्या स्थानी राहिली. चीनची नेमबाज जियान रानसिंगने पहिला क्रमांक पटकावला. तिने ५८७ गुण मिळवले. तर यूनानची अन्ना आणि रुसची बी वितालिना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

हेही वाचा – SL vs IND 1st t20 : कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार लाइव्ह सामना?

मिश्र प्रकारात मनू सौरभ चौधरीच्या साथीने सहभागी होईल. त्यामुळे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी या दोन्ही युवा नेमबाजांकडे आहे.