भारतात क्रिकेटमध्ये अफाट कौशल्य असलेले असंख्य खेळाडू आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे प्रतिनिधित्व करावे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. देशांतर्गत क्रिकेटबरोबरच आयपीएलसारख्या स्पर्धेने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग खुला केला आहे. मात्र आयपीएलची वाढती लोकप्रियता आणि तीव्र स्पर्धा पाहता, या लीगमध्ये संधी मिळवणेही अजिबात सोपे नाही. अशा परिस्थितीत, आयपीएलपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य क्रिकेट असोसिएशनकडून विविध लीग स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून देशाला अनेक गुणवत्तापूर्ण आणि प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे महाराजा ट्रॉफी. चला तर मग, या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराजा ट्रॉफी लीगला कधीपासून सुरूवात झाली?

महाराजा ट्रॉफी केएससीए ही टी-२० लीग स्पर्धा कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने २०२२ पासून सुरू केली आहे. २०२२ मध्ये या स्पर्धेने कर्नाटक प्रीमियर लीगची जागा घेतली. कर्नाटक प्रीमियर लीगला २००९-१० मध्ये सुरूवात करण्यात आली होती. पण मॅच फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणामुळे ही स्पर्धा २०१९ मध्ये स्थगित करण्यात आली. त्यानंतर २०२२ मध्ये महाराजा ट्रॉफी नावाने या स्पर्धेला सुरूवात झाली.

महाराजा ट्रॉफी स्पर्धा राऊंड रॉबिन व नॉकआऊट या फॉरमॅटमध्ये खेळवली जाते. KPL मधील मॅच फिक्सिंग वादानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने अधिक पारदर्शक आणि प्रोफेशनल फॉरमॅटमध्ये ही नवी लीग सुरू केली. महाराजा ट्रॉफी ही आयपीएल स्काऊट्ससाठी महत्त्वाची लीग मानली जाते. या लीगचे आतापर्यंत तीन हंगाम झाले आहेत. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होतात. स्पर्धेतीलसर्व सामने प्रामुख्याने एम. चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरूमध्ये खेळवले जातात. तर काही वेळेस कर्नाटकातील इतर स्टेडियम्सवरही सामने खेळवले जातात.

महाराजी ट्रॉफी स्पर्धेतील सर्व ६ संघ

१. बेंगळुरू ब्लास्टर्स
२. म्हैसूर वॉरियर्स
३. हुबळी टायगर्स
४. मंगळुरू ड्रॅगन्स
५. गुलबर्गा मिस्टिक्स
६. शिवमोग्गा लायन्स

महाराजा ट्रॉफीमधून आयपीएलमध्ये संधी मिळालेले खेळाडू

महाराजा ट्रॉफीमधील सर्वात हायलाईट झालेला खेळाडू म्हणजे रजत पाटीदार. रजत पाटीदार पूर्वीपासूनच आयपीएलमध्ये होता. पण या स्पर्धेमुळे त्याला पुन्हा एकदा टी-२० मध्ये आपला फॉर्म दाखवत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि त्याने यानंतर गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्त्व करत १८ वर्षांत पहिल्यांदाचं चॅम्पियन केलं. याशिवाय देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल, मनीष पांडे हे खेळाडू देखील महाराजा ट्रॉफीमध्ये खेळले आहेत. तर विद्वथ कवेरप्पा, विजयकुमार वैशाक, अभिनव मनोहर, कृष्णप्पा गौतम, श्रीजीत कृ्ष्णा, श्रेयस गोपाल यांनी आयपीएलमध्ये स्थान मिळवलं. हे खेळाडूचं या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारे आणि विकेट घेणारे खेळाडू आहेत.