Trophies Won By Australia Mens And Womens Cricket Team: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अंतिम सामन्यात पोहोचण्याआधी दोन्ही संघांनी एकही सामना गमावला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार असं वाटलं होतं, पण ऑस्ट्रेलियाने हा सामना पूर्णपणे एकतर्फी केला. नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर इंग्लंडला अवघ्या १५० धावांवर रोखलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून पूर्ण केलं आणि सातव्यांदा आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. ही ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची पुरुष आणि महिला संघाने मिळून जिंकलेली २४ वी आयसीसी ट्रॉफी आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून कर्णधार नॅट सिव्हर ब्रंटने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर फ्रेया केंपने नाबाद ४४ धावांची खेळी केली. तर एलिस कॅप्सीने २३ धावांचे योगदान दिले. इंग्लंडने २० षटकांअखेर ४ गडी बाद १५० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर फिबी लिचफिल्डने ४८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने १५१ धावांचे आव्हान ७ गडी राखून आणि १७ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियाने किती वेळा जिंकली आहे आयसीसीची ट्रॉफी?

महिला टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी

वर्षविजेता संघउपविजेता / विरोधी संघ (Runner-up)
२०१०ऑस्ट्रेलियन महिला संघन्यूझीलंड
२०१२ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड
२०१४ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड
२०१८ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड
२०२०ऑस्ट्रेलियन महिला संघभारत ??
२०२३ऑस्ट्रेलियन महिला संघदक्षिण आफ्रिका
२०२६ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड

महिला वनडे वर्ल्डकप ट्रॉफी

वर्षविजेता संघउपविजेता / विरोधी संघ (Runner-up)
१९७८ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड
१९८२ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड
१९८८ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड
१९९७ऑस्ट्रेलियन महिला संघन्यूझीलंड
२००५ऑस्ट्रेलियन महिला संघभारत
२०१३ऑस्ट्रेलियन महिला संघवेस्ट इंडिज
२०२२ऑस्ट्रेलियन महिला संघइंग्लंड

पुरुष वनडे वर्ल्डकप ट्रॉफी

वर्षविजेता संघउपविजेता / विरोधी संघ (Runner-up)
१९८७ऑस्ट्रेलियन पुरुष संघइंग्लंड
१९९९ऑस्ट्रेलियन पुरुष संघपाकिस्तान
२००३ऑस्ट्रेलियन पुरुष संघभारत
२००७ऑस्ट्रेलियन पुरुष संघश्रीलंका
२०१५ऑस्ट्रेलियन पुरुष संघन्यूझीलंड
२०२३ऑस्ट्रेलियन पुरुष संघभारत

पुरुष वनडे वर्ल्डकप ट्रॉफी

वर्षविजेता संघउपविजेता / विरोधी संघ (Runner-up)
२०२१ऑस्ट्रेलियन पुरुष संघन्यूझीलंड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

वर्षविजेता संघउपविजेता / विरोधी संघ (Runner-up)
२०२१-२०२३ऑस्ट्रेलियन पुरुष संघभारत

चॅम्पियन्स ट्रॉफी

वर्षविजेता संघउपविजेता / विरोधी संघ (Runner-up)
२००६ऑस्ट्रेलियन पुरुष संघवेस्ट इंडिज
२००९ऑस्ट्रेलियन पुरुष संघन्यूझीलंड