How Much BCCI Earns After RCB-RR Deal: आयपीएल २०२६ पूर्वी बीसीसीआयवर पैशांचा वर्षाव झाला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांना इतिहासातील सर्वात मोठ्या किंमतीना विकत घेतलं. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात महागडे संघ ठरले आहेत. यानंतर आता बीसीसीआयला या मोठ्या डीलनंतर मोठी लॉटरी लागली असून मंडळावर पैशांचा वर्षाव होणार आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला आहे. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयच्या तिजोरीत आणखी भर पडली आहे. दोन आयपीएल संघांच्या विक्रीमुळे बीसीसीआयला एक हजार कोटींहून अधिक रुपये मिळणार आहेत. २४ मार्चला, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन आयपीएल संघांना ऐतिहासिक रकमेत विकत घेऊन नवीन मालक मिळाले. या दोन फ्रँचायझींच्या खरेदी-विक्रीतून बीसीसीआयला मोठी रक्कम मिळाली आहे.
RCB-RR डीलनंतर बीसीसीआयला एक हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार
आयपीएलमध्ये, जर एखाद्या संघाची मालकी बदलली, तर बीसीसीआय बोर्डाकडे ५% शुल्क जमा करणं बंधनकारक आहे. या नियमानुसार, आरसीबीचा संघ १६,६६० कोटी रुपयांना आर्यमन बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील समुहाने विकत घेतला. यासह आरसीबीचा संघ आयपीएलमधील सर्वात महागडा संघ ठरला. या रकमेच्या पाच टक्के म्हणजे ८३३ कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा संघ १५ हजार कोटी रुपयांना झाली, ज्यामुळे बीसीसीआयला ७५० कोटी रुपये मिळतील. म्हणजेच बीसीसीआयला या दोन्ही संघांच्या ऐतिहासिक विक्रीनंतर १५८३ कोटी रूपये मिळाले आहेत.
२४ मार्च हा भारतीय क्रिकेट आणि आयपीएलसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ एकत्रितपणे ३१,००० कोटी रुपयांना (३१ अब्ज अमेरिकन डॉलर्स) विकले गेले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १.७८ अब्ज डॉलर्सला विकला गेला असून इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेट संघ ठरला. राजस्थान रॉयल्स १.६३ अब्ज डॉलर्सला विकला जाऊन दुसरा सर्वात महागडा संघ ठरला.
आरसीबी फ्रँचायझी आदित्य बिर्ला ग्रुप, अमेरिकन क्रीडा गुंतवणूकदार डेव्हिड ब्लिट्झर आणि अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन यांनी संयुक्तपणे खरेदी केली आहे. आरसीबीचे पूर्वीचे मालक, युनायटेड स्पिरिट्सने, गेल्या वर्षी आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर काही महिन्यांतच फ्रँचायझी विक्रीसाठी काढली होती. आरसीबी पुरूष व महिला दोन्ही संघांची मालकी या समुहाकडे असेल. तर राजस्थान रॉयल्सने काल सोमानी ग्रुपने १५ हजार कोटींना खरेदी केली. आयपीएल २०२६नंतर या दोन नव्या मालकांचे मालकी हक्क हाती घेतील. यंदाच्या वर्षी दोन्ही जुने मालक संघ चालवतील.
