CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

दाऊद थेट ड्रेसिंग रूममध्ये आला अन्…; कपिल देवने सांगितला किस्सा

करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. या दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याने एक संदेश देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जाडेजा त्या व्हिडीओमध्ये बॅट हातात घेऊन आपल्या घरातील लॉनवर खेळताना दिसतो. समोरून आलेला चेंडू टोलवल्यानंतर तो तलवारबाजीसारखी आपली बॅट फिरवतो आणि मग ‘करोनावर मात करण्यासाठी मी घरात थांबलो आहे, तुम्ही?’ असे तो विचारतो.

“…त्यानंतर विराट परत माझ्या नादी लागला नाही”

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की करोनाविरोधातील लढ्यात अजून खूप काही शिल्लक आहे. आपल्याला घरात राहून सगळ्यांचे जीव वाचवण्याचे आपल्या परीने सारे प्रयत्न करायचे आहेत. त्याचसोबत त्याने सुरक्षित राहा असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

“माझी बायको क्रिकेट बघताना मला ‘हे’ प्रश्न विचारते”; रैनाने सांगितला धमाल अनुभव

दरम्यान, योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. म्हणूनच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिनेही प्रतिसाद दिला होता. करोनाग्रस्तांसाठी तिने २१ लाखांची मदत केली होती. तसेच नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले होते.