scorecardresearch

Premium

बॅडमिंटन : प्रणॉयची पदकनिश्चिती, सिंधू गारद

एचएस प्रणॉयने गुरुवारी मलेशियाच्या ली झी जियाला तीन गेमपर्यंत चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत करत आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात तब्बल ४१ वर्षांनंतर भारताचे पदक निश्चित केले.

h s pranoy
एचएस प्रणॉय

एचएस प्रणॉयने गुरुवारी मलेशियाच्या ली झी जियाला तीन गेमपर्यंत चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत करत आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात तब्बल ४१ वर्षांनंतर भारताचे पदक निश्चित केले. मात्र, महिला एकेरीत पीव्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला.

दुखापतीमुळे पाठीला पट्टी बांधून खेळणाऱ्या प्रणॉयने जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या जियाला ७८ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१६, २१-२३, २२-२० असे पराभूत केले. प्रणॉयमुळे यंदाच्या स्पर्धेतील भारताचे बॅडमिंटनमधील दुसरे पदक निश्चित झाले. भारताने गेल्या रविवारी पुरुष सांघिक गटात रौप्यपदक मिळवले होते. १९८२च्या स्पर्धेत सय्यद मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवले होते. हे भारताचे पहिले पदक होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता प्रणॉय चीनविरुद्ध सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर चीनच्या लि शी फेंगचे आव्हान असेल.

navjot kaur
Navjyot kayr : मिस वर्ल्ड स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय वंशाची महिला आहे तरी कोण?
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Irfan Pathan Reply to Pakistan
U19 World Cup Final : भारताच्या पराभवानंतर इरफान पठाण पाकिस्तानवर का भडकला?
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी

हेही वाचा >>>Asian Games: १९ वर्षीय कुस्तीपटू पंघालने जिंकले कांस्यपदक, महिला कुस्तीत खाते उघडले; पूजा-मानसी आणि चीमा पराभूत

महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असणाऱ्या सिंधूला पाचव्या स्थानी असणाऱ्या बिंगजियाओकडून ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात १६-२१,१२-२१ असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सिंधूचे आव्हान पदकाविनाच संपुष्टात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hs prannoy defeats li zi jia in quarterfinals to seal india men singles badminton medal at asian games amy

First published on: 06-10-2023 at 00:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×