भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. बीबीसीच्या जगातील प्रेरणादायी महिलांच्या यादीत मिताली राजला स्थान मिळालं आहे. क्रीडा, राजकारण, व्यापार यासारख्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा या यादीत समावेश करण्यात येतो. यात भारताच्या मिताली राज या एकमेव महिला खेळाडूने जागा पटकावली आहे.

अवश्य वाचा – रुपेरी पडद्यावर पाहता येणार मिताली राजची खेळी

मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. साखळी सामन्यात मिताली राजच्या खेळीमुळे भारत अनेकदा पराभवाच्या छायेतून बाहेर आला होता. मितालीने आतापर्यंत १८६ वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यात ५१.५८ च्या सरासरीने मितालीने ६१९० धावा केल्या आहेत.

अवश्य वाचा – मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणं मितालीच्या चाहत्यांना रुचलं नाही

आपल्या कामगिरीतून इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी असं काम करणाऱ्या महिलांचा या यादीत समावेश करण्यात आलाय. ऑक्टोबर महिन्यात बीबीसी भारतीय महिलांच्या साक्षरतेबद्दल एक अभियान राबवणार आहे. याव्यतिरीक्त सार्वजनिक वाहतूकीत स्त्रियांची सुरक्षितता यासारख्या अनेक विषयांवर बीबीसी अभियान राबवणार आहे. त्यामुळे मिताली राजचं आंतराष्ट्रीय पातळीवर होणारं हे कौतुक प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

अवश्य वाचा – PHOTO : ‘वोग’ मासिकाच्या कव्हर पेजवर मितालीच्या अदांचा षटकार