Hugh Edmeads will handle the responsibility of the auctioneer | Loksatta

IPL 2023 Auction: आयपीएल लिलावात ह्यूग एडमीड्स सांभाळणार लिलावकर्त्याची जबाबदारी, स्वत:च केला खुलासा

एडमीड्स ने स्पोर्टस्टारला पुष्टी केली की, ते आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत. ते म्हणाले बीसीसीआयने आयपीएल लिलाव २०२३ आयोजित करण्यास सांगितल्याबद्दल मी उत्साहित आहे.

IPL 2023 Auction: आयपीएल लिलावात ह्यूग एडमीड्स सांभाळणार लिलावकर्त्याची जबाबदारी, स्वत:च केला खुलासा
ह्यूज एडमीड्स आयपीएल लिलावकर्ते (संग्रहित छायाचित्र-जनसत्ता)

इंडियन प्रीमियर लीगचा सोळावा हंगाम २०२३ मध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल हंगामासाठी सर्व १० संघांनी संघ बांधणी सुरु केली आहे. आयपीएल २०२३ चा हंगामापूर्वी एक मिनी आयपीएल लिलाव आयोजित केला जाणार आहे. हा लिलाव कोची येथे होणार आहे. यंदाच्या लिलावात लिलावकर्ता कोण असणार आहे याची देखील माहिती समोर आली आहे. ही जबाबदारी ह्यूग एडमीड्स सांभाळणार आहेत.

यंदाच्या लिलावात ह्यूज एडमीड्सचे पुनरागमन होणार आहे, ज्यांचा मागील हंगामाचा लिलाव सुरु असताना अपघात झाला होता. ते लिलाव सुरु असताना अचानक जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर गेल्या वर्षीच्या लिलावातून ह्यूग एडमीड्सच बाहेर पडले होते. यानंतर ह्यूग एडमीड्सच्या जागी चारू शर्माने लिलावकर्ता म्हणून जबाबदारी सांभाळली होती. लिलावाच्या शेवटच्या क्षणी एडमीड्स परत आल होते आणि सर्वांनी त्याचे कौतुक केले होते. आता पुन्हा एकदा एडमीड्स लिलावकर्ता म्हणून दिसणार आहेत.

एडमीड्सने स्पोर्टस्टारला पुष्टी केली आहे की ते आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत. बीसीसीआयने आयपीएल लिलाव २०२३ आयोजित करण्यास सांगितल्याबद्दल मी उत्साहित आहे. प्रथमच कोचीला भेट देण्यासाठी देखील उत्सुक आहे.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2022: ऋतुराज गायकवाडचा जलवा कायम; उपांत्य फेरीत झळकावले सलग दुसरे शतक

याआधी आयपीएलचा मिनी लिलाव भारताबाहेर होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आता तो बाहेर न ठेवता भारतातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. यावेळी लिलाव एक दिवसाचा असेल, ज्यामध्ये सर्व १० संघ बोली लावतील. याआधी, फ्रँचायझींनी जाहीर केलेल्या आणि रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. वेळेबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलचा लिलाव सायंकाळी ४ वाजता सुरू होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:38 IST
Next Story
IND vs NZ 3rd ODI: पावसामुळे मालिकेतील तिसरा सामना रद्द! न्यूझीलंडने १-० ने मालिका घातली खिशात